Raid 2 Movie: बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगण  2024 मध्ये एक धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. चाहत्यांना पुन्हा एकदा अजयचा सरकारी अधिकारातील रुद्रावतार पाहता येणार आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट Raid चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे.  Raid 2 चित्रपट या वर्षात नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. या चित्रपटात  अभिनेता अजय देवगण सोबत कोणती अभिनेत्री असणार आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला होता, तर या चित्रपटात अभिनेता अजय देवगण सोबत अभिनेत्री वाणी कपुर झळकणार आहे. चित्रपटाचं शुटींग सुरु झाल्याची चर्चा होतसआहे. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)