महाराष्ट्रात मराठीसह अन्य भाषांतील अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये प्राईम टाईम उपलब्ध करुन देण्याबाबतची बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
मंत्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, निश्चित कार्यप्रणाली करण्यामागे सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार असून यासाठी गृह विभागासह विविध विभागांचे समन्वय आवश्यक असणार आहे. आज झालेल्या बैठकीत मंत्री मुनगंटीवार यांनी येत्या 15 दिवसांमध्ये मराठी चित्रपट निर्मात्यांनी आपली निवेदने द्यावीत जेणेकरुन या विषयाबाबत विस्तृत बैठक 15 जूननंतर घेण्यात येईल असे यावेळी सांगितले. (हेही वाचा: Kedar Shinde On The Kerala Story: महाराष्ट्रात 'द केरळ स्टोरी'चे मोफत शो आयोजित करणाऱ्यांना केदार शिंदेंचा टोला)
मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील काही चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे येणाऱ्या काळात चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री @SMungantiwar यांनी सांगितले. pic.twitter.com/tSt6bGdmIE
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)