Munjya Advance Booking Now Open: शर्वरी वाघ अभिनीत 'मुंज्या' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. हा चित्रपट या शुक्रवारी, 7 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शर्वरी वाघ व्यतिरिक्त अभय वर्मा, मोना सिंग आणि सत्यराज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'मुंज्या' हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे जो केवळ घाबरवणार नाही तर प्रेक्षकांना हसवणार सुद्धा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे रिलीज करण्यात आले ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून ते या चित्रपटाबाबत उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharvari 🐯 (@sharvari)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)