हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाबद्दल अभिनेत्याचे चाहते इतके उत्साहित झाले की, त्यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी थिएटरमध्येच फटाके फोडले. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर आता सलमानची प्रतिक्रिया समोर आली आहे. घटनेबाबत सलमान खानने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सलमान खान म्हणतो, ‘मी टायगर 3 च्या दरम्यान थिएटरमध्ये फटाके फोडल्याबद्दल ऐकले. हे धोकादायक आहे. स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालता चित्रपटाचा आनंद घेऊया. सुरक्षित राहा.’

अहवालानुसार, चित्रपटगृहात फटाके फोडण्याचा व्हिडिओ मुंबईतील मालेगाव येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री येथील एका थिएटरमध्ये 'टायगर 3'चा शो सुरू होता. हा शो पूर्णपणे हाऊसफुल्ल होता. चित्रपटाचा आनंद घेताना अभिनेत्याचे चाहते टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत होते. दरम्यान, काही लोकांनी सीटवर बसून फटाके फोडण्यास सुरुवात केली. आता या व्हिडीओवरून देशभरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या व्हिडिओचा तपास करत आहेत. (हेही वाचा: Tiger 3 Box Office Collection: रिलीजच्या आधी ‘टायगर 3' बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)