Jai Shree Ram Tsunami For Hanuman: 'हनुमान' चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, थिएटरमध्ये 'जय श्री राम'च्या घोषणा (Watch Video)
दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी आपला चित्रपट पौराणिक कथेवर आधारित असल्याचे नाकारले आहे. ते म्हणतात की ही कथा भारताचा इतिहास आहे. दुसरीकडे, हनुमानच्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रत्येक तिकिटातून 5 रुपये अयोध्येतील श्री राम मंदिराला देण्याचे आश्वासन दिले आहे.
Hanuman Film Gets Good Response: प्रशांत वर्मा दिग्दर्शित तेजा सज्जाचा 'हनुमान' हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहे तुडुंब भरली असल्याची परिस्थिती आहे. हा चित्रपट प्रेक्षक पूर्ण भक्तिभावाने पाहत आहेत. चित्रपट पाहताना चित्रपटगृहांमध्ये 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या जात आहेत. सोशल मिडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. चित्रपटगृहात 'जय श्री राम', 'जय बोलो हनुमान' अशा घोषणा दिल्या जात आहेत. या चित्रपटाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी आपला चित्रपट पौराणिक कथेवर आधारित असल्याचे नाकारले आहे. ते म्हणतात की ही कथा भारताचा इतिहास आहे. दुसरीकडे, हनुमानच्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रत्येक तिकिटातून 5 रुपये अयोध्येतील श्री राम मंदिराला देण्याचे आश्वासन दिले आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी ही मदत केली जाईल. 'हनुमान' हा प्रशांत वर्मा लिखित आणि दिग्दर्शित सुपरहिरो चित्रपट आहे. यामध्ये तेजा सज्जा मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर विनय राय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार आणि राज दीपक शेट्टी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. (हेही वाचा: Akshay Kumar Metro Viral Video: मुंबईतील रहदारी टाळण्यासाठी अक्षय कुमार आणि दिनेश विजन यांनी निवडली मेट्रो, अभिनेत्याच्या प्रवासाचा व्हिडिओ झाला व्हायरल)
'Jai Shree Ram' tsunami in theaters as #Hanuman gets super response.
Director Prasanth Varma refused to call his movie a mythology & said that it is Bharat's itihasa (History)
Every ticket purchased gives Rs 5 to Shri Ram Mandirpic.twitter.com/dWAHYRiE0k
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) January 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2024 07:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

