Oppenheimer's Bhagwad Gita Controversy: ओपेनहायमर या हॉलिवूड चित्रपटातील एका दृश्यावरून वाद वाढत आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सेन्सॉर बोर्ड) कडून ओपेनहायमरच्या एका दृश्यावरून माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आश्चर्यचकित झाले आहेत. अनुराग ठाकूर यांनी या चित्रापटातील तो सीन पास कसा झाला? असा प्रश्न केला आहे. यासोबतच त्यांनी वादग्रस्त सीन डिलीट करण्यासही सांगितले आहे. ख्रिस्तोफर नोलनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ओपेनहाइमर चित्रपटात एक दृश्य आहे, ज्यामध्ये चित्रपटाची अभिनेत्री फ्लोरेन्स पग ओपेनहाइमरची भूमिका करणारा अभिनेता सिलियन मर्फीला एका अंतरंग दृश्यादरम्यान गीता वाचण्यास सांगते. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या सीनवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. याप्रकरणी काही जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. (हेही वाचा - Oppenheimer Movie Controversy: आक्षेपार्ह दृश्यामुळे ओपनहायमर चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)