महाराष्ट्र पोलिस सायबर सेल द्वारा मुंबई येथे प्रसिद्ध रॅपर बादशाह याची चौकशी सुरु आहे. ही चौकशी ऑनलाइन सट्टेबाजी कंपनी 'फेअरप्ले' अॅपच्या संदर्भात सुरु आहे. या चौकशीसाठी बादशाहा पोलिसांमध्ये दाखल झाला. तो चौकशला जात असतानाचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर शेअर केा आहे. दरम्यान अलिकडील काही काळात अनेक सेलिब्रेटी ऑनलाईन सट्टेबाजी अॅपच्या जाहिराती केल्याबद्दल अडचणीत आले आहेत. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु आहे.
बादशाहा हा एक प्रसिद्ध रॅपर आहे. त्याने गायलेली अनेक गाणी तरुणाच्या ओठावर असतात. अनेकदा तो वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे. दरम्यान, तरुणाईने मात्र त्याला त्याच्या रॅपसाठी नेहमीच पसंत केले आहे. अलिकडेच त्याचा एक अल्बम जोरदार चर्चेत होता.
व्हिडिओ
#WATCH | Maharashtra Police Cyber Cell is questioning rapper Badshah in Mumbai, in connection with the online betting company app 'FairPlay'. pic.twitter.com/QAcEYqk7Ly
— ANI (@ANI) October 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)