PM Modi-Shah Rukh Duplicates Meet: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही खरे असतात तर काही खोटे म्हणजेच संपादित केलेले. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूड स्टार अभिनेता शाहरुख खान सखोल चर्चा करताना दिसत आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत पीएम मोदींनी शाहरुख खानची भेट घेतल्याचे म्हटले आहे. मात्र हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून, तो तो संपादित केला आहे. यात असलेल्या व्यक्ती या पीएम मोदी आणि शाहरुख खानचे डुप्लीकेट्स आहेत. शाहरुख खान सारखा दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव इब्राहिम कादरी आहे. इब्राहिम हुबेहूब शाहरुख खान सारखा दिसतो. सर्वात आधी नोव्हेंबरमध्ये ibrahim__qadri या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. (हेही वाचा: Wedding Brawl Video: लग्नाचे जेवण आणि स्पेशल भाजीत पनीर नाही? पाव्हने भडकले, भर मांडवातच हाणामारी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)