म्युझिक कंपनी आणि मूव्ही स्टुडिओ टी सीरीजच्या यूट्यूब चॅनलने जागतिक विक्रम केला आहे. T Series YouTube चॅनल हे 200 दशलक्ष (20 कोटी) पेक्षा जास्त सब्‍सक्रायबर्स मिळवणारे जगातील पहिले चॅनेल बनले आहे. आतापर्यंत इतर कोणतेही YouTube चॅनल हा विक्रम करू शकलेले नाही. टी सीरीजच्या YouTube वर इतर भाषा आणि श्रेणींमध्ये आणखी 29 चॅनेल आहेत. सर्वांच्या सब्‍सक्रायबर्स संख्येने 383 दशलक्ष चा टप्पा ओलांडला आहे.

म्युझिक कंपनी T-Series ची स्थापना संगीतकार गुलशन कुमार यांनी 1983 मध्ये केली होती. टी-सिरीज कंपनी कालांतराने देशातील सर्वात मोठी म्युझिक कॅसेट मेकर बनली आणि आजही तिचे नाव सर्वोत्कृष्ट संगीत कंपनीमध्ये समाविष्ट आहे. म्युझिक कॅसेटपासून म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांपर्यंत टीसीरीज कंपनीने यूट्यूबवर इतिहास रचला आहे. T-Series ने 15 वर्षांपूर्वी 2006 मध्ये YouTube वर आपले चॅनल सुरु केले होते.

या चॅनेलद्वारे 16 हजारांहून अधिक व्हिडिओ अपलोड केले गेले आहेत, जे 172 अब्जांपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहेत. त्याच वेळी, यूट्यूबवर विविध भाषा आणि श्रेणींमध्ये टी-सीरीजचे एकूण 29 इतर चॅनेल आहेत. T-Series सह सर्व 30 चॅनेलच्या सदस्यांची संख्या 38.3 कोटी पेक्षा जास्त आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)