Pathaan Controversy: शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukon) यांच्या 'पठाण' (Pathaan Controversy) चित्रपटावरचा गोंधळ दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. मध्य प्रदेशातील हिंदू संघटनांनंतर आता मुस्लिम संघटनाही या चित्रपटाच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत. राज्यातील उलेमा बोर्डाने चित्रपटाला विरोध केला असून ते राज्यात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया मुस्लिम फेस्टिव्हल कमिटीनेही 'पठाण'ला विरोध केला आहे. मध्य प्रदेश हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होऊ देणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मुस्लिम धर्माची बदनामी करण्याची परवानगी कोणालाही नाही, मग तो शाहरुख असो वा कोणीही खान असो.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)