साऊथचा सुपरस्टार धनुषने (Dhanush) आज एक मोठी घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. धनुषने पत्नी ऐश्वर्यापासून (Dhanush Aishwarya Divorce) वेगळे होण्याची घोषणा केली असून या घोषणेने चाहत्यांना धक्का बसला आहे. ऐश्वर्या (Aishwarya) ही सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांची मुलगी आहे. धनुषने Tweet करुन हि माहिती दिली आहे. धनुष म्हणतो, 'आम्ही 18 वर्षे एकत्र होतो ज्यामध्ये आम्ही मित्र, जोडपे आणि पालक म्हणून एकत्र राहत होतो. या प्रवासात आपण खूप काही पाहिलं. आज आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी आता जोडपे म्हणून वेगळे होत आहोत. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला आमची स्पेस द्या.
Tweet
🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)