सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) यांचा आगामी चित्रपट अंतिम-द फायनल ट्रुथ (Antim-The Final Truth) 26 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. आता नुकताच या चित्रपटाच्या दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. 'अपना भाई का बर्थडे' हे या नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यामध्ये आयुष शर्मा गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. त्याचवेळी सलमान खान पोलिसांच्या ड्रेसमध्ये धमाकेदार एन्ट्री करताना दिसत आहे. सलमान खान आणि आयुष शर्मा दोघेही गाण्यात जबरदस्त टशन मध्ये पाहायला मिळत आहे. तसेच हे गाणे प्रविण तरडे दिग्दर्शित 'मुळशी पॅर्टन'चे रिमेक आहे.

मुळशी पॅर्टन मधले गाणे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)