शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून एनसीबीच्या ताब्यात आहे. ड्रग्ज प्रकरणात छापेमारी दरम्यान त्याला एनसीबीने ताब्यात घेतले. तेव्हापासून गौरी खान तिच्या मुलाला जामीन मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र आजही आर्यनला जमीन मिळाला नाही. आज गौरी खानचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिचा एक न पाहिलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात ती खूप रडताना दिसत आहे.

गौरी खानचा हा व्हिडिओ काल संध्याकाळचा असून तो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. गौरी खान काल एनसीबी कार्यालयात गेली होती तेव्हा आर्यन एनसीबी कोर्टातून बाहेर जाताना दिसत आहे. त्याच्या गेटसमोर एक कार उभी आहे ज्यामध्ये गौरी खान मागच्या सीटवर बसलेली दिसत आहे. गौरी खानने आपले तोंड झाकून घेतले आहे मात्र तिच्याच्याकडे पाहून लक्षात येत आहे की ती खूप रडत आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)