Mumbai Slum Viral Video

मुंबई ही स्वप्ननगरी आहे पण इथे स्वप्न पूर्ण करताना मोठा संघर्ष कुणालाच चुकला नाही. मुंबईत आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या तरूणाचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. झोमॅटो डिलेव्हरी बॉय म्हणून काम करणार्‍या या तरूणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात तुफान वायरल होत आहे. मुंबईच्या झोपडपट्टीत राहणार्‍या तरूणाचा हा व्हिडिओ अनेकांच्या मनाला भावला आहे. एका महिला युजरने त्याचा संघर्ष पाहून तीन महिन्यांचं भाडं देऊ केलं आहे. हा तरूण ईशान्य भारतामधून मुंबई मध्ये आला आहे. Pranjoy Borgoyary असं त्याचं नाव आहे. मुंबई मध्ये तो डिलेव्हरी बॉय म्हणून काम करत आहे पण तो एक उमदा गायक आहे आणि राज्यस्तरीय फूटबॉल खेळाडू आहे.

इंस्टावर त्याने आपण मुंबई मध्ये एका छोट्याच्या खोलीत कसे राहतो तिथे जाईपर्यंतदेखील किती त्रास आहे याचं चित्रण व्हिडीओमध्ये केले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचं मन क्षणभर गलबललं आहे. आपल्या बाथरूमपेक्षाही लहानशा घरात आपण राहत असल्याचं तो व्हिडिओ मध्ये म्हणाला आहे. चिंचोळ्या वाटेतून रस्ता काढून वर जाणं त्यानंतर 50 रूपयांची बिर्याणी खाऊन नंतर कामाला सुरूवात करणार असल्याचं त्यानं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

आजारपणात कुटुंबाचे खूप पैसे गेल्याने त्यांच्याकडून मदत मागू शकत नसल्याचं त्याने म्हटलं आहे. या व्हिडिओला इंस्टावर 4.4 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट मध्ये त्याच्या मेहनतीचं कौतुक केले आहे. Zomato Delivery Boy Steal Customer's Package: झोमॅटो डिलिव्हरी बॉय निघाला चोर, ग्राहकाचे घराबाहेरील खाद्यपदार्थाचे दुसरे पार्सल केले लंपास; सीसीटीव्ही समोर येताच कंपनीने मागितली माफी (Watch Video) .

पहा वायरल व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by qb_07 (@qb__.07)

X वर Khushi नामक तरूणीने आपण या व्हिडिओने भावूक झालो आणि Borgoyary चं 3 महिन्याचं भाडं भरल्याचं म्हटलं आहे. आपल्याकडे मदत मागितली गेली नाही तर स्वतःहून मदत केल्याचं तिने म्हटलं आहे.