Unemployment Song 3 | (Photo Credits: YouTuber)

प्रसिद्ध युट्यूबर आदर्श आनंद (YouTuber Adarsh Anand) यांनी युट्यूबवर एक नवे गाणे लॉन्च केले आहे. खरेतर हे गाणे त्यांच्या आगोदच्याच गाण्याची मालिका आहे. या आधी आदर्श आनंद ( Adarsh Anand) यांनी युट्यूबवर दोन गाणी लॉन्च केली आहेत. ही दोन्ही गाणी बेकारीवर भाष्य करतात. आता त्यांनी तसरे गाणे युट्यूबवर लॉन्च केले आहे. हे गाणेही बेकारी या विषयावरच आहे. जवळपास त्यांच्या सर्वच गाण्यांमध्ये उपहास भरलेला असतो. अत्यंत विनोदी सादरीकरण आणि विषयाची मांडणी हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य असते. आदर्श आनंद यांचे बेरोजगारी सॉन्ग (Unemployment Song 3) सोशल मीडियावर (Social Media जोरदार व्हायरल झाले आहे.

यूट्यूबर आदर्श आनंद यांचे 'बेरोजगारी सॉन्ग-3' युट्युबवर आतापर्यंत तब्बल 6 लाख व्ह्यवर्सनी पाहिले आहे. विशेष म्हणजे आनंद यांचे 'बेरोजगारी सॉन्ग 3' हे केवळ चाहत्यांच्या आणि युजर्सच्या मागणीमुळे आले आहे. त्याची गाणी युट्यूब आणि सोशल मीडियावर अनेकांना आवडतात. या गाण्याला हे वृत्त लिहीपर्यंत जवळपास 59 हजार लाईक्स मिळाले आहेत. (हेही वाचा, Meri Umar Ke Berojgaro: 'मेरी उम्र के बेरोजगारों', सोशल मीडियावरील व्हायरल गाण्याने घातली बेकार तरुणाईला साद (Video))

व्हिडिओ

'बेरोजगारी सॉन्ग 3' वर अनेक युजर्सकडून लाईक्स, कॉमेट्स मिळत आहेत. हे गाणे शेअरही केले जात आहे. एका युजर्सने प्रतिक्रिया दिली आहे की, 'हे गाणे विद्यमान स्थितीत सरकारला लगावलेली चपराक आहे. खूपच छान गाणे' दुसरा एक युजर्स म्हणतो आहे की, 'आमच्या समाजाचे या गाण्यात यतार्थ वर्णन केले आहे. गांभीर्याने ऐकणाऱ्याला हे गाणे भावूक करते.' अन्य एक युजर्स म्हणतो की, 'विद्यार्थ्यांचे दु:ख या गाण्यात यतार्थ मांडले आहे. खूप खूप धन्यवाद'