Unemployment Song: 'मेरी उम्र के बेरोजगारों', सोशल मीडियावरील व्हायरल गाण्याने घातली बेकार तरुणाईला साद (Video)
Meri Umar Ke Berojgaro | (Photo Credits: Twitter)

देशातील बेरोजगारीवर भाष्य करणारे एक गाणे सोशल मीडियावर भलतेच व्हायरल (Viral Song) झाले. इतके की अनेकांनी हे गाणे फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरही शेअर केले आहे. व्हिडिओत दिसते आहे की, एक तरुण देशातील बेरोजगारीवर गाण्याच्या माध्यमातून भाष्य करतो आहे. सोबत त्याने आपल्या दोस्तांनाही घेतले आहे. 'मेरी उम्र के बेरोजगारों' (Meri Umar Ke Berojgaro) असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यावरुन आता सोशल मीडियात मिम्सचा पाऊस पाहायला मिळतो आहे. खरेतर हे गाणे जुनेच आहे. परंतू, आता ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे.

व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती बेरोजगारीच्या मुद्द्यावर गिटार वाजवत गातो आहे. या गाण्यावर लोकांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक तरुण मोठ्या मजेत गात आहे. @Mithileshdhar नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. (हेही वाचा, Husband Wife Romance: रोमँटीक पती, लाजरी बायको; पाहा काय घडला संवाद (Video))

हे वृत्त लिहीपर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 42 पेक्षाही अधिक लोकांनी पाहिला होता. तर तितक्याच लोकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या होत्या. एका युजरने तर म्हटले आहे की, बिच्चारा आपले दु:ख सांगत आहे. दुसऱ्याने लिहिले आहे की, हा फ्रस्टेटिया झाला आहे.