Viral Video: सध्या तरुणांना इन्स्टाग्राम रिल्स (Instagram Reels) बनवण्याचं वेड लागलेलं पाहायला मिळतं. सोशल मीडिया (Social Media) हे एक व्यसन बनले आहे, ज्याशिवाय कोणताही तरुण जगू शकत नाही. सोशल मीडिया वापरल्याशिवाय लोकांचा दिवसही जात नाही. सोशल मीडियावर प्रत्येकाला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. व्हायरल होण्यासाठी शर्यत लागली आहे. लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालून रील बनवत आहेत. एका मुलीचा असाच रील बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलगी आपला जीव धोक्यात घालून उंच इमारतीच्या खिडकीतून लटकून धोकादायक स्टंट करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी एका उंच इमारतीच्या खिडकीत उभी आहे आणि एक व्यक्ती तिचा हात पकडून तिला इमारतीच्या खाली लटकवत आहे. कोणत्याही तार किंवा दोरीच्या मदतीशिवाय, ती फक्त मुलाच्या हाताच्या मदतीने खाली लटकत आहे. हा व्हिडिओ पाहून बहुमजली इमारतीतून असा स्टंट करणे किती धोकादाय ठरू शकते, याची कल्पना तुम्हाला आली असेल. (हेही वाचा -Bihar Shocker: Instagram वर Reels बनवण्यापासून रोखल्याने पत्नीने केली पतीची हत्या; आरोपी महिलेला अटक)
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @interesting_aIl नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, इंस्टाग्रामवर लाईक्स मिळविण्यासाठी हे करणे योग्य आहे का? व्हायरल होत असलेल्या या पोस्टनुसार, ही मुलगी रशियन मॉडेल असल्याचे सांगितले जात आहे. (Suicide For Insta Reels: पत्नीला इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्याचे जडले व्यसन, त्रासलेल्या पतीने केली आत्महत्या)
पहा व्हिडिओ -
Are instagram likes really worth doing this? pic.twitter.com/IeTi68nf87
— All things interesting (@interesting_aIl) February 20, 2024
प्राप्त माहितीनुसार, या तरुणीचं नाव व्हिक्टोरिया ओडिंटकोवा आहे. कमेंटमध्ये असाही दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ यूएईचा आहे. ही पोस्ट लिहिल्यापर्यंत 14 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. तसेच 60 हजार लोकांनी व्हिडिओ लाईक केला. मोठ्या संख्येने लोक व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि या स्टंटला भयानक आणि धोकादायक म्हणत आहेत.