Suicide For Insta Reels: पत्नीला इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्याचे जडले व्यसन, त्रासलेल्या पतीने केली आत्महत्या
Mobile Phone Representational Image (Photo Credits: Pixabay)

Suicide For Insta Reels: इंस्टाग्राम रिल्स तयार करण्याच्या पत्नीच्या सवयीला कंटाळून एका ३४ वर्षीय व्यक्तीने गुरुवारी हनुरु येथील भागात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी पुढे सांगितले की, कुमारला पत्नीची रील बनवण्याची सवय आवडत नव्हती, त्याला हे ही आवडत नव्हते की, त्याची पत्नी सतत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असते.

पाहा पोस्ट :

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की कुमारने आपल्या पत्नीच्या आवडीवर आक्षेप घेतला होता, परंतु तिने त्याकडे लक्ष दिले नाही आणि ती रिल्स बनवत राहिली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रिल्स बनवण्यावरून आणि सतत सोशल मीडियावर असल्यामुळे या जोडप्यामध्ये वारंवार वाद होत होते आणि जेव्हा गोष्टी टोकाला पोहोचल्या तेव्हा कुमारने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.