Maci Currin (संग्रहित संपादित प्रतिमा)

अमेरिकेमधील 17 वर्षांच्या मॅकी कुरिन (Maci Currin) ने नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records 2021) केला आहे. मॅकी जगातील सर्वात लांब पाय (World's Longest Legs) असणारी महिला बनली आहे. मॅकीच्या पायांची लांबी जवळजवळ एक मीटर लांब आहे. तिचा डावा पाय 135.267 सेमी (53.255 इंच) लांब आहे, तर तिचा उजवा पाय 134.3 सेमी (52.874 इंच) लांब आहे. टेक्सास (Texas) मधील सीडर पार्क (Cedar Park) येथील मॅकीच्या कुटुंबातील इतर सदस्यही तुलनेने उंच आहेत, परंतु घरामध्ये तिच्या इतके उंच कोणीच नाही.

मॅकीची उंची 6 फूट 10 इंच आहे व तिचे पाय तिच्या एकूण उंचीच्या 60% इतके आहेत. असे लांब पाय लाभणे हे अनेक फायदे आणि त्याच सोबत काही आव्हाने घेऊन येते, परंतु मॅकीला आपण असे असामान्य वैशिष्ट्य प्राप्त केल्याबद्दल अभिमान वाटतो. काही विशिष्ट प्रवेशद्वारांमधून आत जाणे, कारमध्ये बसणे किंवा कपडे फिट न होणे अशा काही समस्या असल्या तरी, तिचे लांब पाय तिला बरेच फायदे देतात. विशेषत: जेव्हा तिच्या हायस्कूलच्या व्हॉलीबॉल संघात खेळण्याची वेळ येते तेव्हा तिला आपल्या लांब पायांचा उपयोग होतो.

 

 

View this post on Instagram

 

Sunday’s are for the girls✌🏻 • Casual + sporty leggings by @zen_ryze

A post shared by 𝙼𝚊𝚌𝚒 𝚌𝚞𝚛𝚛𝚒𝚗 (@_maci.currin_) on

2018 मध्ये मॅकीला प्रथम लक्षात आले की तिच्याकडे सरासरीपेक्षा उंचीपेक्षा जास्त लांब पाय आहेत. त्यावेळी मॅकीला तिला फिट होणारी लेगिंगची जोडी सापडली नाही, दुकानदाराने तिला लेगिंग शिवून घेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी तिच्या धान्यात आले की आपल्याकडे खरोखरच लांब पाय आहेत. त्यानंतर तिने आपण जगातील सर्वांत लांब पायांच्या महिलेचा अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवू शकतो का, याबाबत चौकशी करण्यासाठी सुरुवात केली व आता तिने इतिहास रचला आहे. (हेही वाचा: रातोरात व्हायरल झालेला निळ्या डोळ्यांचा Pakistani Chaiwala पुन्हा एकदा चर्चेत; इस्लामाबादमध्ये सुरु केला स्वतःचा कॅफे)

मॅकीने या रेकॉर्डचे विजेतेपद मिळविल्यानंतर, आता ती रेकॉर्ड मोडण्याचा विचार करीत असलेल्या इतरांना प्रोत्साहन देण्याचे काम करते. मॅकी आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवरही बरीच लोकप्रिय आहे. भविष्यात तिला ब्रिटनमधील महाविद्यालयात जाण्याची आणि जगातील सर्वात उंच व्यावसायिक मॉडेल म्हणून एक यशस्वी कारकीर्द घडवण्याची इच्छा आहे.