रातोरात व्हायरल झालेला निळ्या डोळ्यांचा Pakistani Chaiwala पुन्हा एकदा चर्चेत; इस्लामाबादमध्ये सुरु केला स्वतःचा कॅफे, पहा Arshad Khan च्या 'Cafe Chaiwala Rooftop’ ची झलक
Pakistani Chaiwala Arshad Khan Starts Cafe Chaiwala Rooftop (Photo Credits: Syed Murtaza YouTube, Twitter)

तुम्हाला आठवतंय? 2016 मध्ये, छायाचित्रकार जिया अलीने पाकिस्तान (Pakistan) मधील एका निळ्या डोळ्यांच्या चहा वाल्याचा (Chaiwala) फोटो शेअर केला होता. त्यावेळी अगदी रातोरात हा चहावाला अर्शद खान (Arshad Khan) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इतकेच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मॉडेल म्हणूनही त्याने काम केले. आता 4 वर्षांनी अर्शद खान पुन्हा चर्चेमध्ये आला आहे. तर मॉडेलिंग आणि अभिनयातून पैसे कमावल्यानंतर अर्शदने आता पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये आपला स्वतःचा कॅफे (Café) सुरु केला आहे, ज्याचे नाव त्याने 'कॅफे चायवाला रूफ टॉप' असे ठेवले आहे.

पाकिस्तानी वृत्तवाहिनी उर्दू न्यूजने अर्शदची मुलाखत घेतली आहे. आता तो कुर्ता पायजामावरून थेट सूटवर आला आहे. मात्र त्याचा कॅफे हा पूर्णतः देसी स्टाईल मधील आहे, जो खूपच सुंदर दिसत आहे. याबाबत अर्शद म्हणतो, 'जेव्हा मी माझा कॅफे उघडला तेव्हा बर्‍याच लोकांनी सांगितले की याचे नाव मी माझ्या नावावरून ठेवावे. पण मी त्याला नकार दिला कारण, माझी ओळखच चायवाला आहे व म्हणूनच मी कॅफेला हेच नाव दिले.’ या कॅफेमध्ये चहाव्यतिरिक्त 15-20 खाद्यपदार्थ मिळतात, ज्यामध्ये पुढे वाढ होणार आहे.

अर्शदचा बहुतांश वेळ या कॅफेमध्येच जात आहे. मात्र मनोरंजन क्षेत्राशी निगडीत आपल्या प्रकल्पांवरही तो काम करत आहे. आपण शिक्षण पूर्ण करू शकलो नाही, याबाबत त्याच्या मनामध्ये खंत आहे. पण आपल्या कर्तृत्वाचा त्याना अभिमानही आहे. 2016 साली इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर अर्शदकडे अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्स आले होते. सन 2017 मध्ये तो पाकिस्तानी गायक मुस्कान जयच्या म्युझिक व्हिडिओ बेपर्वाईतही दिसला होता. (हेही वाचा:  मुलाच्या ऑनलाईन क्लास दरम्यान विवस्त्र अवस्थेत आई चुकून झाली कॅमे-यात कैद)

अर्शदच्या या कॅफेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडियावर अर्शदची सर्वजण वाहवा करीत असून, लोकांनी त्याचे अभिनंदनही केले आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये अर्शदमध्ये झालेला बदल हा नक्कीच कौतुकास्पद आहे.