ICC Announces Champions Trophy 2025 Tour Schedule : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी आयसीसीने (ICC) पाकिस्तानसमोर हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) अद्याप त्याबाबत काहीच कळवण्यात आलेलं नाही. पाकिस्तानच्या (Pakistan) या धोरणामुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करणं आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले आहे. सध्या क्रिकेट विश्वातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी घोषणा केली आहे. एकूण 8 देशांमध्ये ही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फिरवण्यात येणार आहे. या ट्रॉफी टूरला आज 16 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. 16 ते 25 पर्यंत ट्रॉफी टूर होणार आहे. पाकिस्तानमधील विविध शहरांमध्ये ही ट्रॉफी फिरवण्यात येणार आहे. (हेही वाचा - India To Host Champions Trophy 2025: पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलला नकार दिल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भारताकडे येणार - अहवाल )
असून यामध्ये ट्रॉफी कोणत्या दिवसी कोणत्या शहरातून प्रवास करेल याबाबत माहिती ही देण्यात आली आहे. यानूसार भारतात 15 ते 26 जानेवारी दरम्यान ट्रॉफी टूर आयोजित करण्यात आली आहे.
पाहा पोस्ट -
Excitement for the upcoming Men's Champions Trophy 2025 builds up, as the Trophy Tour kicks off in Islamabad 🎉https://t.co/QfQJesYVRf
— ICC (@ICC) November 16, 2024
दरम्यान आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील अव्वल 8 संघ (यजमान पाकिस्तानसह) हे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरले आहेत. अफगाणिस्तानची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही स्पर्धा कधी खेळवली जाणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे.