रात्री बेडरुमध्ये झोपण्यासाठी गेलेल्या महिलेला बेड खाली दिसले चक्क 18 साप, पुढे काय घडले वाचा सविस्तर
Sneak (Photo Credits-Twitter)

जर तुम्ही रात्री तुमच्या बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेलात आणि अचनाक तुमच्यासोबत एक विचित्र घटना घडली तर काय होईल? तुम्ही घाबरुन ओरडण्यास सुरुवात कराल हो ना. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. ती जेव्हा तिच्या बेडरुमध्ये झोपण्यास गेली असता तिच्या बेड खाली तिला एक नव्हे तर जवळजवळ 18 साप दिसून आले. महिलेने ही सर्व घटना आपल्या मोबाईल मध्ये कैद करत सोशल मीडियात पोस्ट केली आहे.(Viral Snake Video : अंगणात खेळत असलेल्या लहान मुलाचा पाठलाग करत किंग कोब्राचा घरात घुसण्याचा प्रयत्न)

ट्रिश विल्चर नावाच्या महिलेने झोपण्यापूर्वी तिने तिच्या घराबाहेर काही सरपडत जाणारे जीव पाहिले. त्यानंतर तसाच प्रकार तिने तिच्या घरातील दुसऱ्या बाजूस पाहिला.मात्र जेव्हा महिला झोपण्यासाठी आपल्या बेडरुममध्ये गेली असात तेथे जे तिने पाहिले ते पाहून तिला धक्काच बसला. तिच्या बेडखाली एक मोठा साप होता आणि त्याच्यासोबत त्याची 17 बाळ होती. महिलेला हे दृश्य पाहून शॉक बसलाच पण फरशीवरुन सरपडत जाणारे जीव दुसरे कोणीही नसून सापाची पिल्ल असल्याचे तिला लक्षात आले.

महिलेने पहिल्यांदाच ऐवढ्या सापांना बेडखाली पाहिले असात ती घाबरली आणि बाहेरच्या बाजूला धावत सुटली. पण सर्पमित्रांच्या मदतीने तिने बेडखाली असलेले साप काढले आणि जंगलात सोडून दिले. या सर्व घटनेबद्दल सांगताना महिलेने हसत हसत म्हटले की, मला आता घरात चालताना फिरताना त्रास होतोय. तर एखाद्या ठिकाणी बसणे तर दूरच राहिले. या सर्व प्रकारामुळे आता मला एका हृदयासंबंधित डॉक्टरांची गरज पडू शकते. ऐवढेच नव्हे तर माझ्या बेडखाली एका सापाने ऐवढ्या पिल्लांना जन्म दिल्याच्या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीय असे ही तिने म्हटले.