Lam Fricien Nuen (Photo Credits: Youtube)

स्त्रीच्या सौंदर्याला चारचाँद लावणारी एक नैसर्गिक देणगी म्हणजे स्तन (Breast), अलीकडे अनेक महिला कृत्रिमरित्या आपल्या स्तनांचा आकार वाढवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. मात्र विदेशातील एका महिलेच्या स्तनांचा आकार चमत्कारिक वेगाने वाढल्याने तिच्या डोक्याला पुरता ताप झाला आहे. थायलंड (Thailand) मधील लैम फ्रेइसी नुएन (Lam Fricien Nuen)  या महिलेच्या बाबतीत मागील तीन वर्षांपासून हा विचित्र प्रकार घडत आहे. यामुळे तिला दैनंदिन आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता तर नुएनच्या स्तनांचा आकार इतका वाढला आहे की त्यांना सांभाळण्यासाठी तिला मानेपासून एक कपडा बांधून ठेवावा लागतो, इतकंच नव्हे तर चालतानाही तिला तोल सांभाळण्यासाठी कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो. या विचित्र प्रकारच्या बाबत तिने माहिती देत युट्युब वर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

युट्युब व्हिडीओ मध्ये बोलत असताना नुएन हिने आपल्याला येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला आहे. नुएनने दिलेल्या माहितीनुसार "हा प्रकार तीन वर्षांपासून सुरु असला तरी मागील 9  महिन्यांपासून स्तनांच्या आकारात वेगाने वाढ होत आहे. यामुळे आता स्तनांचा आकार इतका वाढलाय की त्याच्या वजनाने मान व मणक्यावर प्रचंड दाब पडत आहे. चालताना तर तिला कुबड्या वापरण्या शिवाय काहीच गत्यंतर नाहीये. याबाबत डॉक्टरांना देखील काहीच अंदाज येत नाहीये. Breast Cancer Awareness Month: सेल्फ ब्रेस्ट एक्झामने घरच्या घरी सुरूवातीच्या टप्प्यावर ओळखा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

सुरवातीला जेव्हा स्तनांचा आकार वाढू लागला तेव्हा डॉक्टरांनी नुएनला ब्रेस्ट कॅन्सर व ब्रेस्ट ट्युमरची तपासणी करायला सांगितली होती पण या दोन्ही चाचण्यांमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट समोर आले होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार जोपर्यंत यामागील कारण समोर येत नाही तोपर्यंत तिच्या स्तनांचे ऑपरेशन करणे सुद्धा धोक्याचे आहे. Breast Cancer Awareness Month : ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारात या '6' पदार्थांचा समावेश करा !

लैम फ्रेइसी नुएन ही थायलंड मधील Phitsanulok प्रांतातील रहिवाशी आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचा एक अपघात झाला होता त्यामुळे घरात आर्थिक परिस्थिती तशी हलाखीची आहे.त्यात आता स्वतःला हा त्रास असल्याने ती सुद्धा काम करू शकत नाही या परिस्थितीत तिने लोकांना आपल्याला मदत करण्याची विनंती केली आहे.