नवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फाइल फोटो)

सध्याच्या दिवसात टेक्नॉलॉजीच्या बाबत नवीन नवीन शोध लावले जात आहेत. परंतु या टेक्नॉलॉजीमुळे काहीवेळेस आपण धोक्यात येतो. तर टेक्नॉलॉजीमुळे धोक्यात आल्याची एक घटना बुल्गेरिया (Bulgaria) येथे घडली आहे. येथील एका महिलेने आपल्या नवऱ्याला न्यूड व्हिडिओ बनवून नवऱ्याला पाठवत होती. परंतु तो प्रायव्हेट मेसेज न होता त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग (Live Stream) सुरु झाले. बायकोच्या या एका चुकीमुळे तिचा हा व्हिडिओ तब्बल 2 हजार फेसबुक वरील मित्रांनी पाहिला.

बायकोच्या एका चुकीमुळे दोन हजार लोकांमध्ये तिची नाचक्की झाली. या चुकीमुळे तिला आता लोकांच्या समोर जाण्यास लाज वाटत आहे. महिलेच्या बद्दल असे सांगितले जाते आहे की, तिचा नवरा ब्रिटेन येथे काम करतो. त्यामुळे तिला त्याची फार आठवण येते. म्हणून ती हा व्हिडिओ बनवत होती. मात्र प्रायव्हेट मेसेज चुकुन लाईव्ह स्ट्रिम झाल्याने फेसबुकवर स्टोरीच्या रुपात तो व्हिडिओ पोस्ट झाला.(हेही वाचा-धक्कादायक! Headphones लावून झोपल्याने कानाची विकेट; तरुणाला बहिरेपण)

या प्रकरणामुळे नवऱ्याला वाईट वाटले आहे. त्याने तिच्याशी बोलणे बंद केले आहे. त्याचसोबत महिलेच्या वीस वर्षीय मुलाने ही तिचा हा व्हिडिओ पाहिला आहे. त्यामुळे आता मुलगा सुद्धा घरी जाण्यासाठी नकार देत आहे. यावर मुलाने असे म्हटले आहे की, आईने जे केले आहे त्याबद्दल मी काही वर्ष तिच्यासमोर जाऊ शकत नाही.