कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. चीन येथे जन्मलेला कोरोना व्हायरस भारतात दाखल झाल्यापासून ईशान्य भारतात (North East Indian) राहणाऱ्या लोकांना वर्णद्वेष आणि भेदभावाला सामोर जावे लागत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. नुकताच दिमापूर 24/7 इन्स्टाग्राम या फेसुबक (Facebook) पेजने एक व्हिडिओ शेअर केला आहेत. या व्हिडिओत पंजाबमधील चुन्नी कला नावाच्या छोट्याशा गावातील राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मानसिक छळाला सामोरे जावा लागत असल्याचे दिसत आहे. ईशान्य भारतात राहणारे चीनी आहेत, असा अनेकांचा गैरसमज आहे. याशिवाय, भारतात कोरोना व्हायरस दाखल झाल्यापासून त्यांना आता कोरोना व्हायरस म्हणून चिडवले जात असल्याचे त्यांनी या व्हिडिओत सांगितले आहे. तसेच आम्ही चीनी नाही, भारतीय आहोत असेही ते या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

कोरोना व्हायरस भारतात दाखल झाल्यापासून अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. महत्वाचे म्हणजे, भारतातील इतर राज्यात राहणाऱ्या लोकांना शाररिक तर, ईशान्य भारतात राहणाऱ्या लोकांना मानसिक त्रासाचा सामाना करावा लागत आहे. यामुळे ईशान्य भारतात राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांना मिळणारी चुकीची वर्तणूक त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांसमोर मांडली आहे. व्हिडिओत सर्व विद्यार्थीने भावनिक पोस्ट केली आहे. ज्यात ईशान्य भारतात राहणाऱ्या लोकांसोबत कसा भेदभाव केला जातो, याचे उत्तम उदाहरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजते. या व्हिडिओ मध्ये विद्यार्थी म्हणाले की, सुरुवातीला आम्हाला चीनी म्हणून चिडवले जात होते. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आम्हाला कॉलेज मधून घरी जाताना करोना व्हायरस म्हणून चिडवले जात आहे. एवढेच नव्हेतर काही कॉलेजमधून आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले जात आहे. आमचा चेहरा चीनी लोकांसारखा असला तरीदेखील भारतीय आहोत, अशाप्रकारच्या गोष्टी विद्यार्थ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: पिंपरी चिंचवड शहरात कोरोना व्हायरस बाधित 1 नवा रुग्ण; पुणे जिल्ह्यात COVID-19 संक्रमितांचा आकडा 17 वर पोहोचला

फेसबूक पोस्ट-

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला असून आतापर्यंत जगभरात 6 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भात पाहून राज्यातील शाळा, महाविद्यालय, सिनेमागृह बंद ठेवण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर धार्मिक स्थळांनाही याचा फटका बसू लागला आहे. धार्मिक स्थळावर भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांमुळे अनेकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने 31 मार्च पर्यंत धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.