Viral Video: ताबा सुटल्याने चिमुकला वॉकरसह रस्त्यावर, बाईक वरुन उडी मारुन तरुणाने वाचवला अपघात, पहा हा व्हिडिओ
Viral Video (Photo Credits: Twitter)

फिल्मी दुनियेत आपण अनेक सुपरहिरो पाहिले असतील, कोणी कुठुन पडत असलं की त्याला चटकन उडी मारुन आपल्या हातात कॅच करणारे हे हिरो खर्‍या आयुष्यात तुम्ही कधी पाहिलेत का? जर नसेल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ (Viral Video)  एकदा नक्कीच पाहा. अलिकडे दक्षिण अमेरिकेतील (South America) एक व्हिडीओ बराच चर्चेत आला होता, ज्यात एक लहानगा आपल्या वॉकर मधुन चालत असतो आणि चालता चालता पुढे एक स्लोप येतो ज्यावर हा वॉकर वेगाने खाली येऊ लागतो, त्याचा तोल जातो हे पाहताच रस्त्यावरुन बाईकने जात असणारा एक तरुण आपल्या हातातील चालु बाईक सोडुन उडी मारुन त्या चिमुकल्याला पकडायला धाव घेतो. Shocking Video: हरियाणा मधील बल्लभगढ़ स्टेशन जवळ 13 वर्षांच्या मुलाने 2 वर्षांच्या मुलाला मालगाडीच्या इंजिनाखाली फेकले; पहा व्हायरल व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये आपण पाहु शकता, की समजा जर या तरुणाने तत्परता दाखवली नसती तर तो चिमुकला नक्कीच पडुन त्याला दुखापत झाली असती पण या तरुणाच्या धाडसीपणामुळे या बाळाला साधा ओरखडा सुद्धा उठलेला नाही, या मुलाचा वॉकर पकडल्यावर त्याच्या मागुन तिथे एक महिला सुद्धा धावत येते बहुदा ही त्याची आई असावी जिच्या हातातुन हा वॉकर सुटुन भर रस्त्यात आला होता. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला म्हणुन या हिरोची निदान दखल तरी घेतली जात आहे.

पहा व्हायरल व्हिडिओ

हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांंनी शेअर केला आहे, आणि ज्यांंनी ज्यांंनी हा व्हिडिओ शेअर केला आहे त्या सर्वांनीच या तरुणाचं कौतुक केलं आहे. व्हिडिओवर लाखो लाईक्स आहेत आणि या सगळ्यांंनी व्हिडिओ पाहुन अजुनही जगात माणुसकी टिकुन आहे असे म्हंंटलेय.