Maharashtra News: पालघर जिल्ह्यात एक वर्षाच्या मुलीचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू
Child (Photo Credits: Pixabay) Representational Image

महाराष्ट्रातील (Maharashtra) पालघर (Palghar) जिल्ह्यात एक वर्षाच्या मुलीचा चुकून पाण्याच्या बादलीत पडून मृत्यू (Death) झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी घडली आहे. जेव्हा लहान मुलगी तनुजा गजबारे तुळींजच्या (Tulinj) धनीव बाग परिसरातील तिच्या घरी पाण्याच्या बादलीवर गेली आणि त्यात पडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. स्वयंपाकघरात असलेल्या मुलाच्या आईला बादली काही वेळाने दिसली आणि बाळाला काढून तिला रुग्णालयात नेले. जिथे तिला मृत घोषित करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

या घटनेमुळे गजबारे कुटूंबावर शोककळा पसरली आहे. तसेच या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा 'मिस्टर इंडिया' विजेता Manoj Patil याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमध्ये अभिनेता साहिल खान वर गंभीर आरोप