मिस्टर इंडिया स्पर्धेचे विजेते (Mr India Winner) मनोज पाटील (Manoj Patil) यांनी गुरुवारी पहाटे ओशिवरा येथील राहत्या घरी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रात्री 12.30 ते 1 च्या दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पाटील यांचे मॅनेजर परी नाझ यांनी दिली. काही दिवसांपूर्वी मनोज पाटील यांनी ओशिवारा पोलिस स्थानकात एक पत्र सादर केले होते. त्यात त्यांनी बॉलिवूड अभिनेता साहिल खान यांच्यावर गंभीर आरोप केले होते. साहिल खानने सोशल मीडियावर बदनामी करुन व्यावसायिक जीवनात समस्या निर्माण केल्याचे यात म्हटले होते.
गेल्या काही दिवसांपासून साहिल खान मला आणि माझ्या न्युट्रिशन शॉपला विनाकारण टारगेट करत असल्याने मानसिक त्रास होत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तसंच माझा पत्नीसोबत असलेल्या वादाचा फायदा घेत खोट्या गुन्हांमध्ये अडकण्याचे कारस्थान साहिल खान करत असल्याचे नोटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेचा व्हिसा रद्द होऊ शकेल, असंही यात म्हटलं आहे. या सगळ्याचा त्रास होत असून साहिल खानवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी विनंती मनोज पाटील याने पोलिसांना केली आहे. (Ahmedabad Shocker: पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून पतीची आत्महत्या, मुलीच्या नोटबूकमध्ये मिळाली सुसाईड नोट)
दरम्यान, साहिल खान हा अभिनेता, युट्युबर आणि fitness entrepreneur आहे. स्टाईल, रामा: द सेवियर या सिनेमातून साहिल खानने काम केले आहे. मात्र त्यानंतर तो सिनेमात फारसा झळकला नाही. फिटनेसला प्राधान्य देत त्याने 'मसल्स अँड बीच' नावाची जिम गोव्यात सुरु केली.