
क्रिकेटच्या खेळामध्ये अम्पायर म्हटला की तो धीरगंभीर आणि संयम राखत नि:पक्षपातीपणे निर्णय देणारी असावा अशी प्रतिमा आपल्यासमोर उभी राहते. पण सध्या सोशल मीडीयावर प्रचंड झपाट्याने व्हायरल होणारी एका भारतीय अंम्पायरची क्लिप तुम्ही पाहाल तर हसून हसून बेजार व्हाल नक्की! हटके अंदाजामध्ये क्रिकेटच्या सामन्यामध्ये अंम्पायरिंग करणारा ही व्यक्ती नेमकी कुठली आणि कोणत्या सामन्यादरम्यानची आहे ही गोष्ट समजू शकलेली नाही. पण नेटकरी सध्या या व्हिडिओ क्लिपचा आनंद घेत आहेत.
हटके अंदाजातील अंम्पायरिंग
सोशल मीडीयामध्ये प्रचंड व्हायरल होत असलेला या एका अम्पायरचा व्हिडीओ तुफान गाजत आहे. कॅच आऊट किंवा व्हाईड बॉल सांगण्याची क्रिकेटच्या मैदानात एक विशिष्ट पद्धत आहे पण या अवलिया अंम्पायरने त्याच्या हटके शोधून काढल्या आहेत.क्रिकेटच्या मैदानात उपस्थितांसमोर अशाप्रकारे अम्पायरिंग करणार्या या स्टाईलची सोशल मीडीयात सध्या खूप चर्चा आहे.