Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 21, 2025
ताज्या बातम्या
6 hours ago

Viral Video: घराच्या सोफ्याच्या आत लपला होता किंग कोब्रा, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

किंग कोब्रा हा जगातील सर्वात प्राणघातक आणि विषारी सापांपैकी एक मानला जातो, जर तो एखाद्याला चावला तर त्याच्यासाठी जगणे जवळजवळ अशक्य आहे. अनेकवेळा किंग कोब्रा साप निवासी भागात घुसतात, जे पाहून लोक हैराण होतात. अशा परिस्थितीत जरा विचार करा, तुमच्या घरातील सोफ्यात किंग कोब्रा साप लपला तर तुम्ही काय कराल? होय, किंग कोब्राचा एक आश्चर्यकारक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोब्रा सोफ्याखाली लपून बसला होता.

व्हायरल Shreya Varke | Oct 25, 2024 01:21 PM IST
A+
A-
(Photo Credits: Instagram)

Viral Video: किंग कोब्रा हा जगातील सर्वात प्राणघातक आणि विषारी सापांपैकी एक मानला जातो, जर तो एखाद्याला चावला तर त्याच्यासाठी जगणे जवळजवळ अशक्य आहे. अनेकवेळा किंग कोब्रा साप निवासी भागात घुसतात, जे पाहून लोक हैराण होतात. अशा परिस्थितीत जरा विचार करा, तुमच्या घरातील सोफ्यात किंग कोब्रा साप लपला तर तुम्ही काय कराल? होय, किंग कोब्राचा एक आश्चर्यकारक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोब्रा सोफ्याखाली लपून बसला होता. विचित्र आवाज ऐकून कुटुंबीयआत डोकावले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. @abhisheksandhu1126 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून, त्याला 1.5 कोटींहून अधिक वेळा पाहण्यात आले असून लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे - मी सोफ्यावर बसून ही रील पाहत होतो, अचानक माझ्या हृदयाचे ठोके वाढले, दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, आता घरातील सदस्य बरेच दिवस या उशीपासून दूर राहतील.

सोफ्याच्या उशीत लपलेला किंग कोब्रा

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Ꭺʙʜɪsʜᴇᴋ (@abhisheksandhu1126)

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, सोफ्यावर ठेवलेल्या उशीच्या आत डोकावण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तिथे  त्याच्या आत एक मोठा किंग कोब्रा साप दिसतो. सर्प पकडणारा जेव्हा सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो आपला फणा पसरवतो आणि त्याच्यावर हल्ला करण्याच्या मूडमध्ये येतो. बचाव करताना साप त्या व्यक्तीवर अनेकवेळा हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, पण सर्प पकडणाराही हार मानत नाही.


Show Full Article Share Now