कोरोना काळात 2 तासांत लग्न आटोपण्यासाठी नेटक-यांनी तयार केलेली मजेशीर नियमावली तुम्ही वाचली का?, वाचा Viral WhatsApp Forwards
Representational Image (Photo Credit: Wikimedia Commons)

महाराष्ट्रात कोरोनाचा झालेला उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. यात अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले. यात लग्नघरातील लोकांचे सर्वात जास्त हाल झाले आहेत. आधीच केवळ 25 लोकांना लग्नसमारंभात (Wedding Ceremony) परवानगी असल्याचा नियम घोषित करण्यात आला. त्यात केवळ 2 तासांतच लग्न आटोपावे असे सांगण्यात आले आहे. हे लग्नघरातील लोकांसाठी धर्मसंकटच म्हणावं लागेल. यातून मार्ग कसा काढता येईल याचाच सर्व जण विचार करत आहे. दरम्यान या काळात सोशल मिडियावर 2 तासांत लग्न उरकण्यासाठी नेटक-यांनी मजेशीर नियमावली तयार केली आहे. तसेच अनेक मिम्स देखील व्हायरल होत आहे.

साधारण लग्नविधी, मुहूर्त, नवरीची तयारी या गोष्टींनाच जास्त वेळ जातो. अशा परिस्थितीत लग्न 2 तासांत कसे उरकावे यासाठी मजेशीर नियमावली नेटक-यांकडून तयार करण्यात आली आहे.

*दोन तासात लग्न समारंभ आटपायची नियमावली *

🤔😷

1.आता मामाचे आणि विहिणबाईंचे रुसणे यावर बंधन घालण्यात आले आहे

2. नवरीने मेकअप आटोपता घ्यावा व मॅगी नूडल्स प्रमाणे झटपट तयार व्हावे

3. लग्न विधी लवकर आटोपण्याची ब्राम्हणांची जबाबदारी असेल.10 ऐवजी 3 मंत्र म्हणण्याची अट

4.वधू वरांना वरमालेच्या वेळेस उचलण्यासाठी फक्त 2 मिनिटे दिली जातील

5. जमलेल्या 25 लोकांनी ठरलेल्या वेळात आशिर्वाद द्यावा, सगळ्यांच्या एकदाच दुरून सामुहिक पाया पडले जाईल

6. जेवण पार्सल दिले जाईल व आग्रहाचे 2 गुलाबजाम आधीच पॅक केलेले असतील

7. दोन तासांचा कालावधी होण्याआधी नवरी मुलीच्या रडण्याच्या कार्यक्रमा साठी 10 मिनिट दिले जातील, 😭😭🙄🙄 त्यात तिला प्रत्येकाच्या गळ्यात पडून वेगवेगळे रडायची परवानगी नसेल, काय ते एकदाच रडायचे 10 मिनिट आणि लगेच नवऱ्या मुलाची ही जबाबदारी असेल की त्याने तिला गाडीत बसवून पटकन आपल्या घरी न्यावे.. 🏃🏃 🚗

1) सप्तपदी ऐवजी एकच पदी करावी.

2) पुण्यहवन आणि होम रद्द करावा.

3) राहिलेले सर्व विधी आणि स्वागत समारंभ लॉकडाऊननंतर सवडीप्रमाणे करावेत. ही विनंती

हेदेखील वाचा- Maharashtra COVID-19 Restrictions: महाराष्ट्रामध्ये नव्या निर्बंधांची घोषणा; विवाहसोहळ्यासाठी 25 लोकांनाच परवानगी, सामान्य नागरिकांना लोकलमध्ये बंदी

बाबा लगीन..लॉक डाऊनमधे....

फक्त 25 जणांच्या उपस्थितीत...

भटजी-1

अंतरपाट धरण्यासाठी - 2

नवऱ्याचे आईवडील - 2

नवरीचे आईवडील - 2

नवऱ्याच्या करवल्या - 2

नवरीच्या करवल्या - 2

नवऱ्याचे करवले - 2

नवरीचे करवले - 2

नवऱ्याचे फोटोग्राफर( व्हिडीओ/फोटो) -2

नवरीचे फोटोग्राफर( व्हिडीओ/फोटो) -2

नवऱ्याचे मामा मामी - 2

नवरीचे मामा मामी - 2

मंडप वाला - 1

Dj वाला -1

झाले टोटल- 25

बाकी कोणाला एन्ट्री नाहीये...

कोणी राग मानून घेऊ नये...

बोला शुभमंगल सावधान..!!!

च्यायला नवरा-नवरी राहिलीच की.??

😂😂😂

भरा 50000....😢😢😢

थोडक्यात ही मजेशीर नियमावली वाटत असली तरी विचार करण्यासारखी नक्कीच आहे. अनेक लोक राज्य सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध करत आहे. तर अनेकांनी या नियमाचे स्वागत केले. सर्वात महत्त्वाची एकच गोष्ट येथे सांगावीशी वाटते, सध्याच्या काळात लोकांनी लग्नविधीपेक्षा आपल्या जीवनाचा अवधी वाढवायचा असेल तर या नियमांचे पालन करायलाच हवे.