VIDEO: ऐकावं ते नवलंच! Berlin मध्ये एकत्र आले स्वतःला 'कुत्रा' समजणारे शेकडो लोक; भुंकत, आरडओरडा करत साधला एकमेकांशी संवाद (Watch)
स्वतःला 'कुत्रा' समजणारे शेकडो लोक (संग्रहित संपादित प्रतिमा)

जर्मनीची (Germany) राजधानी बर्लिनमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे कुत्र्यांचे कपडे घातलेले शेकडो लोक रेल्वे स्टेशनच्या बाहेर जमले आणि कुत्र्यासारखे भुंकायला लागले. हे लोक स्वतःला चक्क कुत्रा समजत होते. कुत्र्याची वेषभूषा केलेले लोक 'कुत्रे' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांच्या हक्कासाठी जमले होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ बर्लिनमधील पॉट्सडेमर प्लॅट्झ रेल्वे स्टेशनचा आहे.

'कॅनाइन बीइंग्ज' ग्रुपतर्फे येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा गट स्वत:ला कुत्रा समजणाऱ्या लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक कुत्र्यांसारखे आवाज काढताना आणि भुंकताना ऐकू येत आहेत. लोक कुत्र्यासारखे दिसण्यासाठी बनावट तोंड, शेपटी आणि कपडे घातले होते. या कार्यक्रमात सुमारे 1000 लोक सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, एक्स (X) कम्युनिटीवर (पूर्वीचे ट्विटर) या कार्यक्रमाच्या व्हिडिओबाबतचा संदर्भ देण्यासाठी एक टीप जोडली आहे. एक्स समुदायाचे म्हणणे आहे की, हा व्हिडिओ फॉलसम युरोपमधील आहे. यामध्ये विविध प्रकारचे काम करणाऱ्या समलिंगी पुरुषांचा सहभाग होता. यामध्ये सहभागी झालेले लोक स्वतःला कुत्रे समजत नसून लोकांनी कुत्र्यांसारखे दिसणारे कपडे घातले होते, कारण, कुत्र्यासारखे राखणे, वागणे ही अशा लोकांची फेटिश आहे. (हेही वाचा: Burqa Ban in Switzerland: स्वित्झर्लंडमध्ये बुरखा-नकाब घालणे तसेच चेहरा झाकण्यावर बंदी; संसदेने मंजूर केला प्रस्ताव, उल्लंघन केल्यास होणार दंड)

जपानमध्ये एक व्यक्ती कुत्रा झाल्याची बातमी समोर आल्यानंतर बर्लिनमधील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. जपानमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःला कुत्र्यासारखे दिसण्यासाठी 22,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 18 लाख रुपये खर्च केले होते. या व्यक्तीला सामान्य लोकांपासून दूर राहणे आवडते. या व्यक्तीला टोको म्हणून ओळखले जाते.

टोकोचे यूट्यूबवर 'I Want to Be an Animal' नावाचे चॅनल आहे. त्याचे 56,000 पेक्षा जास्त सदस्य आहेत. टोकोने एक वर्षापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता आणि सांगितले होते की, त्याला लहानपणापासून कुत्रा बनण्याची इच्छा होती. आपले तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, टोकोने जपानी कंपनी झेपेटकडून क्रूड कोली आउटफिट, म्हणजे कुत्र्यासारखा पोशाख खरेदी केला होता. झेपेट सहसा टीव्ही जाहिराती आणि चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझाइन आणि निर्मितीमध्ये काम करते.

उल्लेखनीय आहे की, 2016 मध्ये 'द सीक्रेट लाइफ ऑफ ह्युमन पिप्स' नावाचा डॉक्युमेंट्री रिलीज झाली होती. या डॉक्युमेंटरीमध्ये कुत्र्यांसारखे कपडे घालून जगणे पसंत करणाऱ्या लोकांचे जीवन दाखवण्यात आले. संपूर्ण युरोपातून अनेक लोक यात सहभागी झाले होते.