Emoji Snake Viral Video: स्माइली इमोजी असणाऱ्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; अनोखा साप पाहून तुम्हीही व्हाल हैराण
स्माइली इमोजी साप (Phohto Credits: YouTube)

Emoji Snake Viral Video: सापाचे नाव ऐकताच लोकांच्या अंगाचा थरकाप सुटायला सुरुवात होते. पृथ्वीवरील काही सरपटणारे प्राणी अतिशय धोकादायक आहेत. या प्राण्यांमुळे लोकांचा जीव जावू शकतो. मात्र, जगात असे अनेक लोक आहेत, जे सर्पमित्र म्हणून काम करतात. त्यांचा संपर्क अनेक विषारी तसेच बिनाविषारी सापाशी येत असतो. या जगात, विषारी व बिनाविषारी सापांच्या जवळपास तीन हजार प्रजाती आहेत. ज्यांच्या त्वचेवर त्यांचे स्थान आणि हवामानानुसा खुणा आढळल्या आहेत.

तुम्ही आत्तापर्यंत बरेच प्रकारचे साप पाहिले असतील पण स्मायली इमोजी असलेले साप तुम्ही पाहिला आहे का? आपण असा विचार करत असाल की, आम्ही खोट्या सापाबद्दल बोलत आहोत. परंतु, आम्ही खोट्या नव्हे तर खऱ्या सापाबद्दल बोलत आहोत. जस्टीन कोबिल्का (Justin Kobylka) यांनी ड्रॅगन प्रजातीच्या सापाची एक जात बनविली असून अंड्यातून सापाच्या त्वचेवर पिवळ्या आणि केशरी रंगाच्या स्माईल इमोजी तयार झाले आहेत. या सापाच्या कातडीवर तीन आणि शेपटीवर एक इमोजी आहे. जस्टीनला काहीतरी वेगळं करायचं होतं, पण काहीतरी वेगळं बनलं. या अनोख्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (वाचा - तहानलेल्या किंग कोब्राला सर्पमित्राने बाटलीने पाजले पाणी; अचंबित करणारा व्हिडिओ व्हायरल (Watch Here))

जस्टीन कोबिल्काच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या ब्रीडिंग करिअरमध्ये पहिल्यांदाचं सापांच्या त्वचेवर तीन इमोजी बनवल्या. जस्टिनने हा इमोजी साप 6 हजार डॉलर्स म्हणजेचं सुमारे 4.37 लाख रुपयांना विकला आहे. रेसेसिव म्यूटेशन (Recessive Mutation) मुळे या सापाच्या त्वचेवर स्माइली इमोजी तयार झाल्या आहेत. हे एक विशेष प्रकारचे उत्परिवर्तन आहे, जे जंगलात बनवता येत नाही.