Unique Hairstyles: विचित्र केशरचना, डोक्यावर कोरला घोडा; हेअर स्टाईल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Unique Hairstyles (Photo Credit - Twitter)

सोशल मीडियावर (Social Media) दररोज काही ना काही व्हायरल होत असते. यात बऱ्या-वाईट गोष्टी असल्या तरी सर्वाधिक हटके गोष्टींचा समावेश असतो. आताही सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक विचित्र केशरचना (Unique Hairstyles) सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हेअर स्टाईल (Hairstyle) करताना एका महाभागाने चक्क आपल्या डोक्यावर घोडाच कोरला आहे. विशेष म्हणजे या घोड्याला त्याने खास शेपटीही काढली आहे. शिवाय त्याच्या मानेवरील केसही रुबाबदार आहेत. हा घोडा पाहून अनेकांना हसू आले आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपण पाहू शकता की, एक व्यक्ती सलूनमध्ये बसला आहे. तो केस कापून घेत आहे. पण केस कापणाऱ्याने चक्क वेगळीच हेअर स्टाईल बनवली. त्याने या व्यक्तीच्या डोक्यात पाठिमागच्या बाजूला चक्क घोडा कोरला. विशेष म्हणजे घोडाही इतका छान कोरला आहे की, पाहताक्षणी लक्षात येते. कलेला वास्तवाचा स्पर्ष व्हावा म्हणून त्याने चक्क शेपूट आणि मानेवर केसही ठेवले आहेत. पाहणाऱ्याला वाटते की याने डोक्यात चित्रच काढले आहे. (हेही वाचा, How to Create Facebook Avatar: फेसबुकवर तयार करा आपला अ‍ॅनिमेटेड 'अवतार'; FB ने भारतात लॉन्च केले मजेशीर फीचर, जाणून घ्या कसे वापराल)

ट्विट

सोशल मीडियावर अनेकांना हा व्हिडिओ आकर्षिक करतो आहे. @duvidofazer नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. आतापर्यंत 6 लाखांहून अधिक युजर्सनी हा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओवर लोक मजेशीर प्रतिक्रिया ही देत आहेत.