लांबलचक सापासोबत खेळणाऱ्या 2 वर्षांच्या मुलाचा Video Viral; पाहुन व्हाल थक्क
सापासोबत खेळणारा 2 वर्षांचा मुलगा (Photo Credits: Instagram)

खरंतर साप, मगर अशा सरपटणाऱ्या भयंकर प्राण्यांची बहुतांश लोकांना भीती वाटते. सापाला दुरूनच पाहून लोक पळ काढतात. अशावेळी चुकून एखाद्या प्रसंगात साप समोर आल्यास जीव वाचवण्यासाठी काय करावे, हे अनेकांना सुचणार नाही. परंतु, एक चिमुकला भल्यामोठ्या सापाशी (Giant Snake) अगदी सहज खेळतो. दरम्यान, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक चिमुकला सापासोबत खेळताना दिसत आहे. काही वेळ तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. हा कोणताही एडिटेड व्हिडिओ नाही.

mattwright नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. काम करण्यास शिकत आहे, असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. या व्हिडिओतील दोन वर्षांच्या मुलाचे नाव बैंजो आहे. तो मगरीशी लढणाऱ्या अनुभवी मॅट राइटचा मुलगा आहे. मॅट हा मागील 20 वर्षांपासून उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये महाकाय मगरींना पकडण्यासाठी आणि त्यांचे स्थलांतर करण्याचे काम करत आहे. (Shocking! Man Swallows Snake: व्यक्तीने गिळला चक्क जिवंत साप; धोकादायक स्टंट आला अंगाशी, जाणून घ्या काय घडले पुढे...)

पहा व्हिडिओ:

मॅटचे फोटोज:

व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, एक लहान मुलगा भल्यामोठ्या सापाची शेपटी पकडून खेचत आहे. राइटने आपल्या मुलाला आपल्या कलेचे धडे देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्याने 2 मीटर लांब अजगरचा वापर करण्यात आला आहे. मुलाला सापाजवळ नेताच घाबरण्याऐवजी तो त्याची शेपटी पकडून खेचू लागतो. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रीया उमटत आहेत.