Woman Earns Money by Insulting Men: पुरुषांचा अपमान करून बक्कळ पैसा कमावते 'ही' महिला; काय आहे नेमक प्रकरण? वाचा
Woman Earns Money by Insulting Men (PC - File Image)

Woman Earns Money by Insulting Men: लोक अनेक प्रकारच्या नोकऱ्या किंवा व्यवसाय करून पैसे कमावतात, पण एखाद्याचा अपमान करून बक्कळ पैसा कमावता येतो का? होय, हे तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल किंवा तुमचा यावर विश्वास बसणार नाही. परंतु, अमेरिके (America) च्या मिस्ट्रेस मार्लेने तिच्या असामान्य व्यवसायामुळे (Unconventional Careers) लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मिस्ट्रेस मार्ले (Mistress Marley) पुरुषांचा अपमान करून लाखो रुपये कमावते. या 30 वर्षीय उद्योजकाने एका वादग्रस्त कल्पनेला किफायतशीर व्यवसायात रूपांतरित केले आहे, जेथे पुरुष स्वेच्छेने त्यांना अपमानित करण्यासाठी पैसे देतात.

युट्यूब चॅनेल लव्ह डोंट जजशी बोलताना मार्लेने खुलासा केला की, तिच्या क्लायंटला तिच्याकडून शाब्दिक गैरवर्तन आणि स्वत:ला नियंत्रित करून घ्यायचे असते. ते अपमानित होण्याच्या इच्छेने तिच्याकडे येतात. त्या बदल्यात मिस्ट्रेस मार्लेला लोक मोठ्या प्रमाणात पैसे देतात. मार्लेचा प्रवास सहा वर्षांपूर्वी सुरू झाला, जेव्हा तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मिस्ट्रेस मार्लेला पारंपारिक कॉर्पोरेट नोकऱ्या आर्थिक गरजा पूर्ण करत नाहीत हे लक्षात आले. पर्यायी उत्पन्नाच्या स्रोतांचा ऑनलाइन शोध घेतल्यानंतर तिने यामार्गाने पैसे कमवणाऱ्या महिलांचा समुदाय शोधला. (हेही वाचा- Uttarakhand Landslide Video: अन् अवघ्या काही क्षणात डोळ्यासमोर डोंगराचा मोठा भाग कोसळला; काळजात धडकी भरवणारी घटना (Watch Video))

त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मार्लेला तिचा पहिला पगार मिळाला, जेव्हा एका ग्राहकाने त्याच्या दुपारच्या जेवणाचे बिल भरण्यासाठी तिला 50 डॉलर दिले. तिथून तिचे पेमेंट वाढले. त्यानंतर एका ग्राहकाने सुरुवातीला तिला 1,000 डॉलर पाठवले आणि नंतर त्याला Marley च्या सेवांमधून अनब्लॉक करण्यासाठी अतिरिक्त 208,000 डॉलर पाठवले. (हेही वाचा - Desi Jugaad Bike Video: देशी जूगाड वापरुन तरुणाने बनवली अनोखी बाईक, विना पेट्रोल दुचाकीचा व्हिडिओ व्हायरल)

मार्लेचे क्लायंट वैविध्यपूर्ण आहेत, ज्यात प्रामुख्याने गोरे पुरुष असतात. जे मोर्लेच्या निवासस्थानी सेशनसाठी येतात. या सेशनमध्ये त्यांना नोकर म्हणून वागले जाते, तर कधी त्यांना शारीरिकरित्या नियंत्रित केले जाते. तसेच कधी-कधी त्यांना पट्ट्याने नियंत्रित केले जाते. मार्लेच्या पैसा कमवण्याच्या या विवादास्पद मार्गांसाठी अनेकदा टीकांचा सामना करावा लागतो. परंतु, तरीदेखील मोर्ले तिने निवडलेल्या मार्गावर पुढे जात आहे. तिच्या या पैसा कमवण्याच्या मार्गाने तिची आर्थिक स्थिती लक्षणीयरीत्या सुधारली आहे.