Uttarakhand Landslide Video: उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे मोठ्याप्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. चमोली येथून अशीच घटना उघडकीस आली. भूस्खलनात डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला. या भीषण घटनेचा एक भयंकर व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. घटनेवेळी अनेक नागर्क तेथे होते. भूस्खलन होत असल्याचं लक्षात येताच येथील व्यक्ती तेथून थोडे दूर झाले. तितक्यात डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला. नागरिकांचा गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र रस्ता बंद झाला असून येथील वाहतूक ठप्प आहे.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)