Viral Video: बिहारमधील ANM आणि आशा वर्कर्स यांच्यातील मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पाचशे रुपयांच्या लाचखोरी ठरली वादाचे कारण
Women's Quarrel | (Photo Credit - Twitter)

बिहार (Bihar) राज्यातील लाचखोरी इतक्या अत्युच्च टोकावर पोहोचली आहे की, त्यासाठी चक्क सरकारी कर्मचारी एकमेकांशी मारामारी करु लागल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार नुकताच जमुई (Jamui) जिल्ह्यातील लक्ष्मीपुर प्रखंड येथील रेफरल हॉस्पिटल (Referal Hospital) येथे पाहायला मिळाला. एका नवजात बालकाला बीसीजी लसीकरण करण्यावरुन आशा वर्कर आणि एएनएम यांच्यात जोरदार हाणामारी झाली. रुग्णालयात दोन्ही महिला कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात थेट 'फ्री स्टाईल' हाणामारी केली. या घटनेचा व्हिडिओ (Social Media) आता सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे.

घडले असे की, लक्ष्मीपूर प्रखंड यांथील एका रुग्णायात एका बालकाचा जन्म झाला. बाळंतीन महिलेला सोबत घेऊन आलेली एक आशा कार्यकर्ता रिंटू कुमारी नवजात बालकाला बीसीजी लस देण्यासाठी जेव्हा एनएम रंजना कुमारी यांच्या जवळ पोहोचली तेव्हा ही लस देण्याच्या बदल्यात 500 रुपये मागण्यात आले. जेव्हा हे पैसे कुटुंबीयांनी देण्यास नकार दिला तेव्हा आशा वर्कर आणि एएनएम यांच्यात जोरदार हाणामारी झाली. (हेही वाचा, Live TV Debate सुरु दरम्यान महिला पॅनलीस्ट करु लागली Dance, अँकरला फुटला घाम; प्रेक्षकांचे मनोरंजन, पाहा व्हिडिओ)

व्हिडिओ

रिंटू कुमारी आणि एएनएम रंजना कुमारी यांच्यात पहिल्यांदा बाचाबाची झाली. त्यानंतर वाद वाढला आणि तो थेट हाणामारीपर्यंत येऊन पोहोचला. जवळपास 29 सेकंदाच्या या व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे की, रुग्णालय परिसरात दोन महिला एकमेकांना मारहाण करत आहेत. या दोघी रिंटू कुमारी आणि एएनएम रंजना कुमारी असल्याचा दावा केला जातो आहे. दोघीही एकमेकींचे केस पकडून चप्पलने मारहाण करताना दिसत आहेत. एक पुरुष या दोघींची भांडणे सोडवत असल्याचेही पाहायला मिळते. हा प्रकार सुरु असताना उपस्थित असलेल्या काहींनी या घटनेचा व्हिडिओ शूट केल्याचे समजते. दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने घटनेची दखल घेतली असून, चौकशी सुरु केली आहे.