Live TV Debate सुरु दरम्यान महिला पॅनलीस्ट करु लागली Dance, अँकरला फुटला घाम; प्रेक्षकांचे मनोरंजन, पाहा व्हिडिओ

कोणतेही न्यूज चॅनल घ्या त्यावर कोणती ना कोणती तरी थेट चर्चा (Live TV Debate) असतेच. या चर्चेदरम्यान, प्रश्न विचारताना अँकरने घेतलेला वेळ, आलेल्या पाहुणांनी कारणाशिवाय घातलेला वाद आणि उपस्थित केलेले मुद्दे या सगळ्यांतून मूळ विषयाला किती न्याय मिळतो हा संशोधनाचाच मुद्दा. अनेकदा तर ही गेस्ट मंडळी ज्या पद्धतीने गोंधळ घालतात त्यामुळेच ही चर्चाच एक चर्चेचा विषय होऊन बसते. सोशल मीडियावर असाच एक लाईव्ह टीव्ही डिबेट व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यात एक महिला बोलता बोलता चक्क डान्स Women Viral Dance) करताना दिसते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार पॅनलीस्ट असलेल्या एका महिलेला बोलण्याची संधी मिलाली नाही. त्यामुळे ती सुरुवातीला आपला आवाज वाढवून इतरांचे लक्ष वेधून घेताना दिसते. मात्र, काही क्षणांमध्येच ही महिला चक्क डान्स करु लागते. ती आपला चेहराही वेडावाकडा करताना दिसते. तिच्या या भावमुद्रा आणि वर्तन यामुळे अँकरही क्षणभर गोंधळतो. तर उपस्थित पॅनलिस्टही अवाक होता. या सगळ्यात प्रेक्षकांचे मात्र मनोरंजन होते. (हेही वाचा, Rope Jump With Snake In Palghar Video: साप दोरीसारखा पकडून उड्या, अतिउत्साही तरुणाचा जीवघेणा प्रताप (पाहा व्हिडिओ))

व्हिडिओ

व्हिडिओत आपण पाहू शकता की, ही महिला पॅनलीस्ट काही बोलू पाहात होती. दरम्यान, वृत्तवाहिनीच्या निवेदकाने तिच्याकडे दुर्लक्ष करत दुसऱ्याच गेस्टला बोलण्याची परवानगी दिली. त्यामुळे बिचारी ही महिला अँकर भलतीच नाराज झाली. तिने निवेदकाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर तिने चक्क डान्स करण्यास सुरवात केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून, युजर्स त्यावर मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत.