सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल ( Viral Video) होण्यासाठी लोक काहीही प्रयत्न आणि प्रयोग करत असतात. यातील काही प्रयत्न हे कौतुकास्पद असतात तर काही तद्दन मुर्खपणा या कक्षेत मोडणारे. काही संबंधितांच्या जीवावर बेतणारे तर काही जीवघेणे ठरणारे. पालघर (Palghar ) येथील एक तरुण सोशल मीडियात अशाच काही विक्षिप्त आणि जीवघेण्या कृतीमुळे चर्चेत आला आहे. शिवाय प्राणीमित्रांच्या टीकेचा विषय ठरला आहे ते वेगळेच. या तरुणाने चक्क जीवंत सापाला पकडून (Snake Video) त्याचा दोरीसारखा वापर करत चक्क दोरीउड्या (Rope Jump With Snake In Palghar Video) मारल्या आहेत. या विचित्र प्रकाराचा व्हिडिओही आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या तरुणाचा पोलिसांकडून सध्या शोध सुरु असल्याचे समजते.
साप हातात घेऊन त्याच्यासोबत दोरीउड्या मारणाऱ्या या अतिउत्साही तरुणाचे नाव समजू शकले नाही. मात्र, हा विक्षिप्त तरुण सोशल मीडियावर मात्र व्हायरल झाला आहे. तरुणाच्या हातातील साप धामण प्रजातीचा असल्याचे समजते. तसेच, हा साप बिनविषारी असल्याचे काही मंडळींचे म्हणने आहे. मात्र, तहीरी कोणत्याही मुक्या प्राण्याशी अशा जीवघेण्या पद्धतीने खेळण्याचे समर्थन होऊ शकत नाही. (हेही वाचा, साप चावल्यावर या 7 प्रकारे मानवी शरीरात चढते विष, होतो मृत्यू; वाचा महत्त्वपूर्ण माहिती)
व्हिडिओ
स्वत:च्या मनोरंजनासाठी मुक्या प्राण्यांसोबत गैरवर्तन करण्याच्या अनेक घटना पाठीमागील काही दिवसांमध्ये उघडकीस आल्या आहेत. कुत्र्याच्या शेपटीला फटाक्यांची माळ बांधून ती पेटवणे. मुक्या प्राण्याचे डोळे फोडणे. झोपलेल्या प्राण्याजवळ मोठ्या आवाजाचे फटाके फोडणे, गॅसचे फुगे कुत्र्याच्या पाठीला बांधून ते हवेत सोडणे यांसह अशा कितीतरी विचीत्र घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आल्या आहेत. प्राणीमित्र संघटनांकडून नेहमीच अशा घटनांचा निषेध केला जातो. अनेकदा प्रकरणे न्यायालयात जातात पण. त्यातून फारसे काही हासील होते असे दिसत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळणे थांबायला हवे. यासाठी अनेक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था जनजागृती करत असतात. तरीही अशा घटना वारंवार पुढे येतात. सरकारनेच यात आता अधिक लक्ष घालून कडक कारवाईसाठी कायदा करावा अशी मागणई विविध स्तरातून वाढते आहे.