झोपलेली मांजर सापाला रश्शी समजून मारत होती मीठी, नंतर काय झाल ते तुम्हीच पाहा (Watch Video)
Photo Credit: Youtube

सोशल मिडीयावर कोणता ना कोणता व्हिडिओ रोज व्हायरल होताना आपल्याला पहायला मिळतो. इंटरनेटवर प्राण्यांचे असे अनेक व्हिडिओ आहेत जे कितीही पाहिले तरी आपले मन भरत नाही. इंटरनेटवर मांजरींचे बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, ज्यात ते डोळे झाकून किंवा काही गुंडगिरी करत आहेत. मांजरीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो काही वेगळा आहे. वास्तविक, ती झोपेत असताना तिच्यावर एक साप जवळ आला आणि मांजर त्याला दोरी असल्याचे समजून त्याच्याबरोबर खेळू लागली.परंतु जेव्हा मांजरीने आपले डोळे उघडले, तेव्हा तिने जे पाहिले त्यावर तिचा विश्वासच बसला नाही.सापाला इतके जवळ पाहिल्या नंतर मांजरीने जी धूम ठोकली की बस रे बस. आपला जीव वाचवण्यासाठी मांजर जेवढ्या जोरात धावू शकत होती तेवढी ती धावली. (ATM मधून हँड सॅनिटायझरची चोरी करणारा व्यक्ती CCTV कॅमेऱ्यात कैद; Watch Viral Video)

हा व्हिडिओ कधी काढलेला आणि कुठला आहे हे माहित नाही, परंतु व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मांजरीने वेळीच डोळे उघडले नसते तर ते खूप वाईट झाले असते असा विचार करून वापरकर्ते दुखी आहेत. मांजरीच्या धक्कादायक प्रतिक्रियेमुळे बरेच जण आश्चर्यचकित झाले आहेत परंतु मांजरीला सुरक्षित पाहून जीव भांड्यात पडला.

मांजरी मूडी आणि वारंवार वर्तन बदलांसाठी ओळखल्या जातात. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये मांजरी तिच्या मालकाबरोबर स्पा घेताना दिसली. व्हायरल व्हिडिओमध्ये चेस नावाची मांजर पलंगावर पडलेली होती आणि तिच्या डोळ्यावर कापलेली काकडी ही बघितली गेली होती.