Viral Video: प्रत्येक देशातील लोक आपल्या देशाच्या राजकारणाला विरोध करण्यासाठी विविध पद्धती अवलंबतात. यात निषेध करणे, मोर्चे काढणे किंवा नेत्यांची पुतळे जाळणे आदीचा समावेश आहे. पण, भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तान (Pakistan) मध्ये काहीतरी अनोखे पाहायला मिळाले आहे. जिथे पाकिस्तानच्या जनतेने आपल्या नेत्यांचा निषेध करण्यासाठी असा आविष्कार केला आहे, जो पाहून लोकांना हसू आवरणे कठीण झाले आहे.
अलीकडेच, भारताने 15 ऑगस्ट रोजी आपल्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला. तर पाकिस्ताननेही 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला. यानंतर सोशल मीडिया (Social Media) वर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, मौलाना फजलुर रहमान आणि आसिफ अली झरदारी या तीन नेत्यांचा फोटो या व्हिडिओमध्ये दिसत आहे. (हेही वाचा - Dahi Handi 2022: गोविंदाला 23 व्या वेळीही फुटली नाही दहीहंडी; नेटीझन्स म्हणाले, आता हे मटके बनवणाऱ्या कुंभाराला शोधावं लागेलं; Watch Viral Video)
The start up ecosystem in Pakistan has truly come of age. This #AutomaticLaanatMachine is the latest invention from the land of the pure. pic.twitter.com/qarqf3PsSA
— Major Gaurav Arya (Retd) (@majorgauravarya) August 18, 2022
त्यानंतर जुगाडच्या माध्यमातून या चित्रांसमोर लाकडी स्टँड तयार करण्यात आला आहे. त्या लाकडाला आणखी एक लाकूड जोडले आहे, ज्याला तीन चप्पल जोडल्या आहेत. त्याला दोरीही जोडलेली दिसत आहे. दोरी ओढताना या तीन नेत्यांच्या चेहऱ्यावर चप्पल पडते. म्हणजे दोरी ओढून लोक राजकारण्यांना चप्पल मारत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मेजर गौरव आर्य यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, 'पाकिस्तानमधील स्टार्ट अप इकोसिस्टम खरोखरचं जुनी आहे. #AutomaticLaanatMachine हा शुद्ध भूमीवरील नवीनतम शोध आहे.' हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटीझन्स मजेशीर कमेंट्स करत आहेत.