Dahi Handi 2022: श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्त देशभरात जन्माष्टमी साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी (Dahi Handi) फोडण्याची परंपरा देशभरात साजरी करण्यात आली. सोशल मीडियावर दहीहंडी दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी वर चढतो. परंतु, त्याला दहीहंडीचे मटके फुटत नाही. 23 वेळा प्रयत्न करूनही या गोविंदाला मटके फुटत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंन्ट दिल्या आहेत.
वास्तविक, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील आहे. या व्हिडिओत दहीहंडीचा जबरदस्त कार्यक्रम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पिरॅमिड बनवून वर टांगलेले मटके तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, सलग 23 वेळा भांडे फोडण्याचा प्रयत्न करूनही हे मटके फुटत नाही. (हेही वाचा - Himachal Chakki Railway Bridge Collapsed: हिमाचल आणि पंजाबला जोडणारा चक्की रेल्वे पूल कोसळला; Watch Video)
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गोविंदा बनलेल्या एका मुलाने हंडी फोडण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. पण खूप मेहनत करूनही तो मटकी तोडू शकला नाही. यानंतर दुसरा तरुण पूर्ण उत्साहात वर चढतो आणि भांडे फोडण्याचा प्रयत्न करतो. लागोपाठ 23 वार करूनही त्याला हे मटके फुटत नाही. अखेर तो खाली येतो.
शेवटी, हे भांडे फुटत नाही. या संपूर्ण घटनेचा कोणीतरी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्यान, एका यूजरने या व्हिडिओवर कमेंन्ट करताना लिहिले की, लोक आता हे भांडे बनवणाऱ्या कुंभाराचा शोध घेत आहेत.