Dr Varanya Nganthavee । (Photo Credit: Facebook/Varanya Nganthavee)

थायलंडची राजधानी बॅंकॉक येथे एक भलताच प्रकार पाहायला मिळाला. येथील स्थानिक डॉक्टर वरन्या नगांथावी (Varanya Nganthavee) एका महिला रुग्णाच्या कानातून चक्क जीवंत पाल (Lizard) बाहेर काढली. पाल बाहेर काढल्यावर महिलेला वेदनेपासून आराम मिळाला. पण, कानात पाल शिरल्याचे समजताच महिलेची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली. ही घटना सोशल मीडियातून व्हायरल झाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कानात खाज आणि प्रचंड वेदना होतात अशी तक्रार घेऊन एक महिला डॉक्टरांकडे आली. महिलेचा त्रास जाऊन घेतल्यावर डॉक्टरांनी तिच्या कानाची बारकाईने तपासणी केली. डॉक्टरांना महिलेच्या कानात काहीतरी अडकल्याचे प्रथमदर्शनी ध्यानात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन पाहिले. पण, विशेष फरक पडला नाही. महिलेच त्रास मात्र कायम होता.

दरम्यान, डॉक्टरांनी महिलेला काही प्रतिजैवके देऊन पाहिली. तरीही महिलेच्या कानदुखी आणि वेदनेवर काही फरक पडला नाही. त्यामुळे डाक्टरांना शंका आली. डॉक्टरांनी ऑटोस्कोप द्वारे महिलेच्या कानाची तपासणी केली. या तपासणीत महिलेच्या कानात एक लांबडा किडा हालचाल करत असल्याचे दिसले.

Dr Varanya Nganthavee । (Photo Credit: Facebook/Varanya Nganthavee)

डॉक्टरांनी विशिष्ट प्रकारचे उपकरण वापरुन तो कीडा अलगत बाहेर काढला. हा किडा पाहून डॉक्टर, नर्स आणि पीडित महिलाही आश्चर्यचकीत झाले. कानातून बाहेर काडलेला किडा हा किडा नव्हता तर, ती एक छोटी पाल होती. या पालीला डॉक्टर आणि नर्स लोक सुरुवातीला एक किडा समजत होते. (हेही वाचा, पाकिस्तानमध्ये असाही जुगाड: चक्क गायीला बाईकवर पुढे बसवून केला प्रवास; पहा व्हिडिओ)

या घटनेबाबत एक फेसबुक पोस्ट शेअर करत डॉ. वरन्या यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, महिलेच्या कानातील पाल जिवंत होती. ती कानात हालचाल करत होती. त्यामुळे महिलेला कानदुखी आणि वेदनेचा त्रास होत होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या पालिला जिंग जोक नावाने ओळखले जाते. ही पाल रुग्ण महिलेच्या कानात कशी घुसली याबाबत माहिती मिळू शकली नाही. सध्या ही महिला डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहे.