पाकिस्तानमध्ये असाही जुगाड: चक्क गायीला बाईकवर पुढे बसवून केला प्रवास; पहा व्हिडिओ
गायीचा बाईकवरून प्रवास (Photo Credit : Youtube)

आजकाल प्राण्यांच्या प्रवासासाठीही वाहनांचा वापर होतो. कुत्रा, मांजर, पक्षी असे प्राणी दुचाकी-चारचाकी मधून आरामात प्रवास करतात. मात्र पाकिस्तानमध्ये चक्क दुचाकीवर  गायीला घेऊन प्रवास केल्याची घटना घडली आहे. एक व्यक्ती दुचाकीरवर समोर गायिका घेऊन प्रवास करत आहे. ही गाय अत्यंत शांत बसून प्रवास एन्जॉय करत आहे. या गोष्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून पाकिस्तानमध्ये अक्षरशः काहीही होऊ शकते या गोष्टीवरचा विश्वास दृढ होतो.

(हेही वाचा: मुलाच्या जन्मानंतर हॉस्पिटलमधून घरी परत येताना टॅक्सीमध्येच विसरले बाळ; पालकांचा हलगर्जीपणा)

सोशल मिडीयावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. काहींनी या ‘जुगाड’चे कौतुक केले आहे तर काहींनी हा प्राण्यांवरील अन्याय असल्याचे म्हटले आहे. तसेच गायीसारखा मोठा प्राणी दुचाकीवरून घेऊन जाण्याने अपघात होण्याचीही शक्यता आणि भीती काही जणांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, काही देशांमध्ये अशाप्रकारे प्राण्यांना घेऊन जाणे हा गुन्हा आहे, मात्र पाकिस्तानमध्ये याबाबत कोणीही काही बोलत नाही. याचबाबत अनेक युजर्सनी पाकिस्तान देशाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.