जर्मनीतील (Germany) हॅम्बर्गमधील (Hamburg) एका कुटुंबाने आनंदाच्या भरात अशी काही गोष्ट केली की, ही घटना आयुष्यभर त्यांच्या स्मरणात राहील. आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन येताना या बाळाला चक्क हे पालक गाडीतच विसरून आले. आपले बाळ गायब असल्याचे जेव्हा यांच्या लक्षात आले तेव्हा बराच उशीर झाला होता. ही बातमी वाऱ्यासारखी वेगाने पसरली आणि शेवटी फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून व्हायरल झाली. सोशल मिडीयावरील या पोस्टनुसार हे बाळ या जोडीचे दुसरे अपत्य होते.
तर, मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्याने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. दोघेही प्रचंड खुश होते, काही दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर दोघे घरी यायला निघाले. आल्यावर उत्साहाच्या भरात दोघे गाडीतून उतरले, त्यांचा मोठा मुलगाही उतरला, सामान बाहेर आले मात्र लहान बाळ गाडीमध्ये राहिले आणि गाडी निघून गेली. जेव्हा या दोघांच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा गाडीवाला निघून गेला होता. यांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला मात्र काहीच फायदा झाला नाही.
गाडीमध्ये हे लहान बाळ झोपले होते त्यामुळे चालकालाही आपल्या गाडीत बाळ असल्याची कल्पना आली नाही. त्यानंतर टॅक्सी ड्राइव्हरचा लंच ब्रेक झाला. आपली कार अंडरग्राउंड पार्किंगमध्ये पार्क करून तो पेटपूजा करायला गेला आणि हे बाळ तसेच आतमध्ये राहिले. जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे तो टॅक्सी घेऊन विमानतळावर निघून गेला. जेव्हा गाडीमध्ये नवीन प्रवासी बसला तेव्हा त्याने या बाळाबद्दल विचारले. ड्रायव्हरला याबाबत काहीच कल्पनान नसल्याने त्याने पोलिसांकडे तक्रार केली. शेवटी पोलिसांनी अथक प्रयत्नाने या बाळाच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्याकडे याला सुपूर्त केले.