Surat Hospital मधील डॉक्टरांनी 'असा' साजरा केला कोरोना रुग्ण महिलेचा वाढदिवस; पहा Viral Video
Doctors Celebrating COVID-19 Patient's Birthday (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात परिस्थिती चिंताजनक झाली असून सर्वत्र नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यातच एक सकारात्मक व्हिडिओ समोर येत आहे. ऑक्सिजनवर असलेल्या कोरोना रुग्णाचा वाढदिवस डॉक्टर आणि नर्सेसने गाणं गावून साजरा केला. या प्रसंगाचा व्हिडिओ मुंबई फोटोग्राफर व्हायरल भयानी (Viral Bhayani) ने शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे. गुजरातच्या सुरत सिव्हील हॉस्पिटल (Surat Civil Hospital) मधील हा व्हिडिओ आहे. (रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी डॉक्टरांनी Sunny Deol च्या 'या' गाण्यावर PPE Kit घालून केला डान्स; पहा Viral Video)

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल, कोविड रुग्ण असलेली महिला ऑक्सिजन लावून बसली आहे.  तिचा वाढदिवस असल्याने डॉक्टर्स, नर्सेस एकत्रितपणे तिच्यासाठी गाणं गात आहेत. 'बार बार दिन ये आये...' हे गाणे गावून हॉस्पिटलमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी महिलेचा वाढदिवस साजरा केला. सध्याच्या या कठीण काळात डॉक्टरांनी उचललेले हे पाऊल अत्यंत स्त्युत्य आहे. त्यामुळे रुग्णांचे मानसिक बळ नक्कीच वाढण्यास मदत होईल.

पहा व्हायरल व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

(हे ही वाचा: कोरोनाच्या रुग्णाचा एकटेपणा दूर करण्यासाठी नर्सने उचलले 'हे' अनोखे पाऊल, सोशल मीडियात कौतुकाची थाप)

यापूर्वी देखील आरोग्य कर्चमाऱ्यांनी कर्तव्यापलिकडे जात रुग्णसेवेसाठी विशेष पाऊलं उचलल्याचे पाहिला मिळाले होते. कोरोना रुग्णांना वाटणारा एकटेपणा, होणारे मानसिक खच्चीकरण या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या लहान सहान कृती त्यांना मोठा आधार देतात.