Brazil Nurses Use Gloves Filled with Warm Water to Comfort COVID-19 Patients! (Photo Credits: Twitter/@sadiquiz)

Brazil: कोरोनाच्या परिस्थितीशी संपूर्ण जग लढत आहे. तर नागरिकांना सुद्धा या भयावह अशा महासंकटाचा सामना गेल्या एका वर्षाहून अधिक काळ सहन करावा लागत आहे. त्याचसोबत एकमेकांपासून दूर अंतर ठेवावे लागत असल्याने काही वेळेस एखाद्याची मदत करणे सुद्धा मुश्किल होत चालले आहे. अशातच ब्राझील मधील एका नर्सने कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्णांची मदत करण्यासाठी एक अनोखे पाऊल उचलले आहे. तिच्या या कतृत्वाचे आता सर्व कौतुक केले जात आहे.(Fact Check: सरकारी रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या मास्कमुळे लोक बेशुद्ध पडत आहेत? जाणून घ्या या व्हायरल ऑडिओमागील सत्यता)

इंटरनेटवर गल्फ न्यूजचे सादिक समीर भट्ट यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, देवाचा हात, नर्सने कोविडच्या रुग्णांना विलिगिकरण कक्षात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दोन डिस्पोजेबल ग्लोव्स गरम पाण्याने भरुन रुग्णाच्या हाताला बांधले आहेत. फ्रंटलाइन वर्कर्सला सलाम असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. हा फोटो सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत असून खुप जणांनी तो लाईक्स आणि शेअर सुद्धा केला आहे.(Tulsabai मध्य प्रदेशात 118 वर्षीय भारतातील सर्वात वृद्ध महिलेने घेतला कोविड 19 लसीचा पहिला डोस; भारतीयांना बिनधास्त लस घेण्याचं आवाहन Watch Video)

Tweet:

तर ब्राझीलमध्ये फेब्रुवारी 2020 नंतर पहिल्यांदाच या आठवड्यात एकाच दिवशी 4 हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी कोरोना व्हायरसमुळे 4195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 3,37,000 पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमावला आहे. तर सातत्याने मृतांचा आकडा वाढत असल्याने ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांनी लॉकडाऊन लागू केला जाणार नाही असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, कोणताही देशव्यापी बंद नसणार आहे. आमची सेना लोकांना त्यांच्या घरी ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरणार नाही.  दरम्यान, राष्ट्रपती बोल्सोनारो यांना जुलै 2020 मध्ये कोरोनाची लागण झाली होती.