Steve Irwin 57th Birthday: गूगल डूडलच्या माध्यामातून जगप्रसिद्ध 'Crocodile Hunter'ला खास मानवंदना
Steve Irwin Google Doodle (Photo Credits: Google Homepage)

Steve Irwin Birthday Google Doodle:  आजचं गूगल डूडल (Google Doodle) ऑस्ट्रेलियन वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेटिव्ह स्टीव  इर्विन   Steve Irwin च्या 57 व्या वाढदिवसानिमित्त बनवण्यात आलं आहे. स्टिव्ह टेलिव्हिजनवर 'The Crocodile Hunter' या शो मधून जगभर प्रसिद्ध झाला होता. मगरीसारख्या अनेक उभयचर प्राण्यांबद्दल स्टिव्हने डॉक्युमेंट्रीज केल्या होत्या. गूगलच्या होम पेजवर आज स्टिव्हच्या हातामध्ये मगर पकडलेला खास फोटो गुगल डूडलच्या माध्यमात रेखाटण्यात आला आहे. डिस्कवरी, नेशनल जियोग्राफिक आणि अ‍ॅनिमल प्लॅनेटवर त्याचे खास कार्यक्रम दाखवले जात असे.

ऑस्ट्रेलियामध्ये स्टिव्हने वन्य जीव आणि प्राण्यांसाठी विशेष काम केलं आहे. ऑस्ट्रेलियातील क्विन्सलॅंडमध्ये त्याने खास Reptile Park उभारलं आहे. जे Beerwah Reptile Park म्हणून ओळखलं जातं. स्टिव्ह ला या वन्यप्राण्यांना सांभाळण्याचा वसा त्याचा घरातूनच मिळाला आहे. स्टिव्हचे पालक Bob आणि Lyn यांनी त्याला सहाव्या वाढदिवसादिवशी 11 फूट लांब अजगरीच्या जमातीतील साप भेट म्हणून दिला होता. स्टिव्हनेही त्याची खूप काळजी घेतली. पुढे त्याच्या आयुष्यात आलेली साथीदारदेखील त्याला प्राणीसंग्राहलयातच भेटली. Terri ही स्टिव्हची पत्नी प्राणीसंग्राहलयाला भेट द्यायला आली होती. तिथेच त्यांची ओळख झाली आणि ते प्रेमात पडले. Terri आणि Steve यांचं हनिमूनदेखील जंगलात मगरींचा शोध घेण्यात त्यांनी घालवलं होतं.

'स्टिव्हला जगाला त्याची ओळख लक्षात राहील की नाही याची पर्वा नव्हती पण त्याचा संदेश जगाला पोहचावा अशी इच्छा होती. 'असा खास मेसेज टेरीने आज शेअर केला आहे. 4 सप्टेंबर 2006 दिवशी स्टिंगरे या एका विषारी माश्याच्या डंखाने स्टिव्हचा मृत्यू झाला.