मुस्लिम महिलेच्या कपवर ISIS लिहिल्याने Starbucks यांच्या विरोधात तक्रार दाखल करत भेदभाव केल्याचा लावला आरोप
मुस्लिम महिला (Photo Credits: YouTube, Twitter)

1 जुलैला अमेरिकेतील मिनेसोटा मधील सेंट पॉल मध्ये एका महिलेने स्टारबक्स (Starbucks) बरिस्ता (Barista) यांच्याकडून स्वत:साठी कॉफी खरेदी केली. मात्र कॉफी खरेदी केल्यानंतर कॉफी कपवर लिहिलेल्या गोष्टीमुळे तिला धक्काच बसला. खरंतर कॉफीच्या कपवर तिच्या नावाऐवजी आयएसआयएस (ISIS) असे लिहिण्यात आले होते. आपल्या नावाऐवजी अशा पद्धतीने लिहिलेले पाहून महिला संतप्त झाली. याच कारणास्तव आयशा नावाच्या मुस्लिम महिलेने स्टारबक्स यांच्या विरोधात भेदभाव केल्याचा आरोप लावत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

आयएसआयएस म्हणजेच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सिरिया ही एक दहशतवादी संघटना आहे. या दहशतवादी संघटनेकडून आतापर्यंत बहुतांश दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. असे सांगतिले जात आहे की, कोरोना व्हायरसमुळे मुस्लिम महिला आयशा हिने मास्क घातला होता. तसेच स्टारबक्स मधून कॉफी खरेदी करताना तिने तिचे नाव सुद्धा सांगितले होते.(Giant Golden-Crowned Flying Fox चे फोटो व्हायरल; मात्र हा मानवाच्या आकाराचा वाटवाघूळ नसून फोटोग्राफीची 'अशी' आहे कमाल! घ्या जाणून) 

रिपोर्ट्सनुसार, ऑर्डर देताना जेव्हा मुस्लिम महिलेला तिचे नाव विचारले असता तिने तिचे नाव दोन वेळा सांगितले. त्यामुळे नावात चुकी होणे अशक्यता आहे. पीडित महिलेने सीएनएन यांना असे सांगितले की, आयशा हे एक अज्ञात नाव नाही आहे. तसेच दोन वेळा नाव सांगून सुद्धा कॉफी कपवर आयएसआयएस लिहिण्यात आले.(शार्क मासा चोचीत पकडून पक्षी समुद्रातून उडाला आकाशी, किनाऱ्यावरचे लोक बघतच राहिले, पाहा Viral Video)

जेव्हा महिलेला कॉफी कफ दिल्यानंतर त्यावर आयएसआयएस लिहिल्याचे पाहिल्यावर तिचा अपमान झाल्याचे तिला वाटले. आयएसआयएस हा असा एक शब्द आहे जो देशातील मुस्लिम प्रतिष्ठेला प्रभावित करतो. या घटनेनंतर 19 वर्षीय आयशा हिने मिमेसोटा डिपार्टमेंट ऑफ ह्युमन राइट्स यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच अशा पद्धतीचे नाव लिहिण्यावरुन तिने स्टारबक्समधील प्रबंधक स्टाफला विचारले असता त्यांनी चुकून असे लिहिल्याचे स्पष्टीकरण दिले. प्रबंधकाने त्यांची चुकी लपवत त्याकडे कानाडोळा केला. ऐवढेच नाही तर महिलेला नवीन पेय आणि एय युएसडी 25 सुद्धा गिफ्ट कार्ड दिले.